रामदास आठवले, सुनील तटकरेंना कोरोनाची लागण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली असून खबरदारीचा उपाय म्हणून दोघेही मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत.

सोमवारी माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असं सुनील तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

तर माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान  माझ्या संपर्कात आलेल्यांनी  खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.  

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

कोरोना साथीच्या सुरूवातीच्या टप्प्यात मुंबईतील नरीमन पॉईंट इथं काही चिनी लोकांसोबत ‘गो कोरोना कोरोना गो’ अशा घोषणा रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आठवले चांगलेच चर्चेत आले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गृह विलगीकरणात असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील कोरोना चाचणी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने गृह विलगीकरणात होते. राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या  संदेशाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा- केवळ मराठीचा आग्रह धरणं संविधानविरोधी- रामदास आठवले

पुढील बातमी
इतर बातम्या