Advertisement

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर दौरा करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाच्या संकटकाळात आणि त्यापाठोपाठ अतिवृष्टीने बेहाल झालेल्या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर दौरा करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वत:च ट्विटरवरून दिली असून सध्या ते होम क्वारंटाईन आहेत. (BJP leader Devendra Fadnavis tests positive for COVID-19)

कोरोनाचं संकट गडद असताना आणि लाॅकडाऊनमुळे जनता त्रासलेली असताना राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जनतेची कैफियत ऐकूण घेतानाच आवश्यक त्या ठिकाणी जनतेला सेवासुविधा पुरवण्यासाठी निर्देश देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी सातत्याने केल्या. कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळानंतर त्यांनी कोकणचा दौरा केला होता.

परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून राज्य सरकारने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं.

हेही वाचा- होम क्वारंटाईनमध्येही अजित पवारांचं काम जोमात

त्यातच भाजपने बिहार निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी टाकल्यानंतर बिहारमधील निवडणुकांमध्येही ते व्यस्त होते. त्यातच त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.

'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,' असं फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

फडणवीस यांच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतलं असून ते देवगिरी या आपल्या शासकीय निवासस्थानवरूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून दैनंदिन कामकाज करत आहेत.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा