Advertisement

होम क्वारंटाईनमध्येही अजित पवारांचं काम जोमात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला देखील व्हिसीच्या माध्यमातून अजित पवार उपस्थित होते.

होम क्वारंटाईनमध्येही अजित पवारांचं काम जोमात
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार गुरूवार २२ आॅक्टोबर रोजी थकवा जाणवत असल्याने होम क्वारंटाईन झाले आहेत. सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव अजित पवार गृह विलगीकरणात असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचं कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. दुपारीच एका महत्त्वाच्या बैठकीत ते सहभागी झाले होते.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा नुकताच दौरा केला होता. या दौऱ्याहून घरी आल्यानंतर त्यांना ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला की पाॅझिटिव्ह याबाबत अधिकृतरित्या कळू शकलेलं नाही. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. (maharashtra deputy cm ajit pawar attends meeting from home quarantine)

हेही वाचा - अजित पवार होम क्वारंटाईन, कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह की निगेटिव्ह?

असं असलं तरी त्यांचं दैनंदिन कार्य सुरूच आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हिसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणं, अधिकाऱ्यांना सूचना देणं, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणं, फाईलींचा निपटारा करणं आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला देखील व्हिसीच्या माध्यमातून अजित पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना राज्य शासनाकडून १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हिसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. असंही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा - नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर- उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा