Advertisement

केवळ मराठीचा आग्रह धरणं संविधानविरोधी- रामदास आठवले

केवळ मराठीतूनच बोललं पाहिजे असा आग्रह चुकीचा तर आहेत, परंतु तो संविधानविरोधी देखील आहे, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.

केवळ मराठीचा आग्रह धरणं संविधानविरोधी- रामदास आठवले
SHARES

मुंबई ही सर्व भाषिकांची आहे. ती देशाची आर्थिक राजधानी असल्याने केवळ मराठीतूनच बोललं पाहिजे असा आग्रह चुकीचा तर आहेत, परंतु तो संविधानविरोधी देखील आहे. त्यामुळे शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला माझा ठाम विरोध आहे, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. (It is wrong to force people to speak only marathi in mumbai says ramdas athawale)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात दक्षिण भारतातील, उत्तर भारतातील याप्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरीक येऊन राहतात. त्यामुळे मराठीसोबतच मुंबईत गुजराती, पंजाबी, हिंदी, दाक्षिणात्य भाषा बोलली जाते. त्यामुळे मुंबईत प्रत्येकाने केवळ मराठीतच बोललं पाहिजे हा आग्रह अयाेग्य आहे. संविधानविरोधी आहे. ज्याला जी भाषा बोलायचीय ती बोलण्याचा अधिकार आहे, असं रामदास आठवले म्हणाले. 

हेही वाचा - मराठीत बोलण्यास ज्वेलर्सचा नकार, लेखिकेच्या आंदोलनानंतर मनसेचा दुकानदाराला दणका

मुंबई शहर हे सगळ्यांचं शहर आहे. या शहराने अनेकांना सांभाळलेलं आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून अनेक उद्योगधंद्यांना सांभाळलेलं आहे. टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज, गोदरेज अशा उद्योजकांना मुंबईने फार काही मिळवून दिलेलं आहे. शिवसेनेत उत्तर भारतीय/ दक्षिण भारतीय असे विंग आहेत. त्यांना सर्वांची मतं मिळत असल्यानेच महापालिकेत सत्ता मिळते, हे त्यांनी विसरता कामा नये. दुकानांवर केवळ मराठी पाटी असेल, तर इतरांना ते दुकान कसलं आहे, हे कळणार नाही. त्यामुळे मराठीसाठी शिवसेनेने पुढाकार जरूर घ्यावा, परंतु इतर भाषा बोलण्यावर आक्षेप असता कामा नये, त्यामुळे शोभा देशपांडे आणि शिवसेनेची भूमिका चुकीची आहे. अमराठी भाषिकांना मुंबईतून बाहेर काढण्यासाठी दादागिरी झाली, तर दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं जाईल, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या मालकानं मराठीत बोलण्यास नकार दिल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी रात्रभर त्याच्या दुकानासमोर ठिय्या मांडला होता. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा, असं म्हणत अखेर महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा