बापरे! ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेली १ लाखांच्या पुढे

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने गुरूवार ६ आॅगस्ट २०२० रोजी १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई आणि पुण्यानंतर १ लाख कोरोनाबाधितांची नोंद झालेला ठाणे हा तिसरा जिल्हा ठरला आहे. (thane district cross 1 lakh covid 19 patient mark)

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बुधवार ५ आॅगस्ट २०२० रोजी ठाणे जिल्ह्यात एकूण ९९,५६३ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात बरे झालेले रुग्ण- (६६,३३३), मृत्यू (२८२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१) आणि ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,४०६) इतके होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गुरूवारी १३१२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा पार केला. 

गुरूवारच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत बाधित रुग्ण- (१०,०८७५), बरे झालेले रुग्ण- (७०,९८३), मृत्यू (२८७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,०१२) इतके आहेत. 

हेही वाचा - कोरोनातून बरे झालेले २२ रुग्ण प्रकृती खालावल्यानं पुन्हा रुग्णालयात

तर ठाण्याच्या पुढे असलेल्या पुण्यात बाधित रुग्ण- (१,०४,३५३), बरे झालेले रुग्ण- (६०,८५७), मृत्यू- (२४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०००) इतके आहेत आणि मुंबईत बाधित रुग्ण- (१,२०,१५०) बरे झालेले रुग्ण- (९२,६५९), मृत्यू- (६६४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५४६) इतके आहेत. 

मुंबई आणि ठाण्याची तुलना करता मुंबईतील ॲक्टिव्ह रुग्णांची (२०,५४६) संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली दिसत आहे. तर ठाण्यात मात्र ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या (२७,०१२) मुंबईपेक्षा जास्त आहे. तर पुण्यात हीच संख्या जवळपास दुप्पट (४१,०००) आहे.

दरम्यान राज्यात गुरूवारी देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात रुग्ण बरे होणाचं प्रमाण ६५.९४ टक्के एवढं आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हेही वाचा - अरे व्वा! नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात

पुढील बातमी
इतर बातम्या