मुंबईत 'ड्राइव्ह इन टेस्ट'ला सुरूवात, गाडीतच बसूनच होणार कोरोनाची चाचणी

मुंबई महानगरपालिकेनं काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटरच्या सहाय्यानं कोरोनासाठी ड्राईव्ह इन टेस्टचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये कारमध्ये बसूनच कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. मुंबईत सध्या भायखळा, परळ, दादर, विक्रोळी, बोरीवली, मुलूंड यांसह अनेक ठिकाणी उपलब्ध असलेल्या पालिकेच्या वाहनतळांवर हा उपक्रम सुरू केला आहे.

 ड्राईव्ह इन टेस्टमध्ये गाडीत बसलेल्या व्यक्तीकडून खिडकीची काच थोडीशी खाली करून 'स्वॉप' टेस्टसाठी त्याच्या लाळेचे नमुने घेतले जातात.  टेस्टचे नमुने 24 तासांनंतर व्यक्तीला ईमेलवर पाठवले जातात. यामुळे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे का याचं तातडीनं निदान होऊन त्या व्यक्तीवर उपचार सुरू करता येतील.

कुणामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी कोरोनाच्या चाचणीसाठी दिलेली चिठ्ठी मिळताच 1800222000 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे. त्यानंतर  एक टोकन दिलं जाईल ज्यात जवळपास ही टेस्ट कुठे होत आहे याची माहिती देऊन  तिथं पोहचायची एक निश्चिच वेळ दिली जाईल. त्यावेळेस व्यक्तीला गाडीत बसून त्या ठिकाणी पोहचायचं आहे. संबंधित प्रत्येक खाजगी संस्थेनं या उपक्रमातून दिवसभरात किमान 250 टेस्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जेणेकरू जास्तीत जास्त व्यक्तींच्या टेस्ट घेऊन या रोगावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला शक्य होईल.


हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या