२ महिन्यांनंतरही प्रिन्सच्या मृत्यू अहवालाची प्रतिक्षा

केईएम रुग्णालयात ( आग (fire) लागल्यामुळे चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर (चा मृत्यू दोन महिन्यांपूर्वी मृत्यू (death) झाला होता. मात्र, अद्याप प्रिन्सचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याचा अहवाल प्रिन्सच्या पालकांना देण्यात आलेला नाही. हा अहवाल अद्याप तयारच झाला नसल्याची माहिती उघड झाली आहे. 

प्रिन्सचे वडील राजभर यांनी प्रिन्स (ज्या सदोष उपकरणामुळे भाजला त्या उपकरणामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा दोष होता, आग (fire) लागली तेव्हा ती तातडीने विझवण्यात आल्यावरही प्रिन्सचा हात कसा भाजला असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, अद्याप त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीएमईआरने विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. या समितीत बालरोगतज्ज्ञ (, विद्युत उपकरणांशी निगडित विभागातील तज्ज्ञ, तसेच जेजे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचाही समावेश होता. पंधरा दिवसांत चौकशी समितीचा अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी अद्याप अहवाल आलेला नाही. 

केईएम रुग्णालयाच्या ( हलगर्जीपणामुळे शारीरिक स्वाथ्य बिघडलेल्या प्रिन्स राजभर ( या २ महिन्यांच्या बाळाचा गुरूवारी मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्याचा रक्तदाब (खालावत जाऊन रात्री २.३० वाजता प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मूळ उत्तर प्रदेशमधील असलेल्या पन्नेलाल राजभर यांनी हृदयविकारावरील उपचारांसाठी प्रिन्सला परळमधील केईएम रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रिन्सला बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात ( दाखल करण्यात आलं होतं. परंतु ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री प्रिन्सला लावलेल्या ईसीजी यंत्रणेत शाॅर्टसर्किट होऊन प्रिन्स होरपळला. प्रिन्सला ठेवण्यात आलेल्या बेडवरील चादरीलाही आग लागली. ज्यात प्रिन्सचा खांदा, कान आणि कमरेचा भाग भाजपला. प्रिन्सच्या हाताला गंभीर इजा झाल्याने त्याच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येत होता. त्यामुळे त्याचा हात कापावा लागला होता. 

तेव्हापासून त्याची प्रकृती सातत्याने खालावत होती. त्याला आॅक्सिजन (ची पातळी जास्त असलेल्या व्हेंटिलेटर (वर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्याचा रक्तदाब ( खाली जात होता. त्याचं हृदय नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रिन्स (prince) ला ३ वेगवेगळी औषधं दिली जात असल्याची माहिती गुरूवारी केईएम रुग्णालयाचे ( अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी दिली होती. अखेर हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा २ आठवड्यांपासून सुरू असलेला जगण्याचा संघर्ष थांबला.


हेही वाचा -

३ रुग्णालयांचा बदलणार चेहरामोहरा, पालिकेकडून २७५ कोटींचा खर्च

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाजणार 'वॉटर बेल'

अखेर 'त्या' रुग्णांसाठी धावली महापालिका


पुढील बातमी
इतर बातम्या