पश्चिम रेल्वेचं जगजीवन राम रुग्णालय घेतंय रुग्णांची विषेश काळजी

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेचे वैद्यकीय विभाग कोरोनाच्या या आपत्तीजनक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सर्व रुग्णालयं हाताळत सक्रियपणे आपली कर्तव्यं पार पाडत आहे. त्याशिवाय, पश्चिम रेल्वेचं जगजीवन राम रुग्णालय आयसोलेशन वॉर्डसाठी १७२ बेड पुरवून कोरोना व्हायरसच्या उपचारात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या रुग्णालयात आतापर्यंत एकूण ५५५ रूग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी ३४१ रुग्ण बाधित असून, ११७ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. 

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कठीण परिस्थितीत जगजीवन राम रुग्णालयाततील रूग्ण आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांची काळजी घेण्यासाठी तसंच, त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलली आहेत.

रुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

  • कर्मचारी व रूग्णांसाठी गरम व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रूग्णाला सकाळी आणि संध्याकाळी १ लिटर पाण्याची बाटली देण्यता येत.
  • दिवसातून ३ वेळा रुग्णांना शिजवलेले पदार्थ घरी पोचवण्याची व्यवस्था केली आहे. योग्य स्वच्छता राखण्यासाठी, रुग्णांना डिस्पोजेबल भांडीमध्ये खाद्य दिले जाते.
  • रुग्णांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक मजल्यावर स्मार्टफोनची व्यवस्था करण्यात आली आहे. ईसीजी, एक्स-रे, प्रयोगशाळेच्या चाचण्यांचे अहवाल स्मार्ट फोनद्वारे कळविले जातात.
  • रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी फोन कॉल करू शकतात.
  • डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचारी ७ दिवसात ८ तासांची ड्युटी करतात. यानंतर या कर्मचाऱ्यांना पुढील ७ दिवस अलगीकरण आणि निरीक्षणामध्ये ठेवलं जातं.
  • मुंबई सेंट्रल, दादर, मरीन लाईन्स आणि फोर्ट येथील हॉटेलमध्ये १८० कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  
  • कर्मचारी आणि डॉक्टरांना अन्न पुरवलं जातं.
  • कर्मचार्‍यांसाठी मिनी बस देखील भाड्यानं घेण्यात आली आहे.


हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

मुंबईतील 'या' कोरोना काळजी केंद्रातील खाटांच्या संख्येत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या