Advertisement

मुंबईतील 'या' कोरोना काळजी केंद्रातील खाटांच्या संख्येत वाढ


मुंबईतील 'या' कोरोना काळजी केंद्रातील खाटांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळं महापालिकेन खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना काळजी केंद्रातील खाटांची क्षमता वाढविली आहे. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील केंद्रात ४० खाटांची अतिदक्षता उपचार सुविधा (आयसीयू) उभारण्यात येत आहे. तसंच, महालक्ष्मी रेसकोर्स येथील केंद्राचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या शनिवारपासून या दोन्ही सुविधा कार्यान्वित होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एनएससीआय इथं बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या जंबो फॅसिलिटी सुविधांबाबत आयुक्तांनी माहिती दिली. महापालिकेची प्रमुख रुग्णालयं, उपनगरीय रुग्णालयं, खासगी रुग्णालयं व दवाखाने या सर्वांमध्ये करण्यात आलेल्या सेवासुविधा, तरतूद, रुग्णांना खाटा व रुग्णवाहिका जलदगतीनं व समन्वयानं उपलब्ध करून देण्याबाबत सुरू असलेली कार्यवाही याची सविस्तर माहिती पालकमंत्री ठाकरे यांना देण्यात आली.

नॅशनल स्पोटर्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) इथं ५०० खाटांचे कोरोना काळजी केंद्र यापूर्वीच सुरू झाले आहे. यामध्ये आता ४० खाटांची अतिदक्षता उपचारांची सुविधा जवळपास पूर्णत्वास आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स इथं पहिल्या टप्प्यात ३०० खाटांची क्षमता असलेले कोरोना काळजी केंद्राचं काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये १०० खाटा या आयसीयू उपचारांसाठी आहेत. या केंद्राचा विस्तार म्हणून आणखी ५०० खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा