ओमिक्रोन हा नवा व्हेरिएंट आल्यानंतर सरकारबरोबरच मुंबई महापालिकाही सर्व खबरदारी घेत आहे. कोरोनाच्या नवा स्ट्रेन ओमिक्रोन संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
त्या म्हणाल्या की, ८७ लोक आत्तापर्यंत दक्षिण अफ्रिकेतून आलेत. आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे, कोविड सेंटर सज्ज आहेत, आता ते पुन्हा ॲक्टीव करावे लागणार आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, कोविडचा मुकाबला करण्यासाठी डाॅक्टर, नर्सेसचा स्टाफ आपल्याकडे आहे. एअरपोर्ट बाबात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि बाहेरील देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुबीयांची चाचणी केली जाईल.
जे करता येईल ते ते करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. लाॅकडाऊन कोणालाच नको आहे मात्र नियमावली पाळा, असं आवाहनही महापौरांकडून करण्यात आलंय.
काही कोविड सेंटर बंद ठेवली होती. मात्र आता ती पुन्हा सरू करण्यासाठी पालिका सज्ज असल्याचं महापौर म्हणाल्या आहेत. पण लहान मुलांचे लसीकरण झाले नाही आणि पालक सुद्धा मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, असंही महापौर बोलले.
दरम्यान, गेल्या १९ दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून शे-दोनशे नाही तर तब्बल एक हजार लोक आले आहेत. या लोकांची ट्रेसिंग सुरू करण्यात आली आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूनं हाहा:कार उडवला त्या देशातून मुंबईत एक हजार लोक आल्यानं मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. १० नोव्हेंबरपासून मुंबईत १ हजारच्या आसपास लोक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना ट्रेस केलं जातं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा