अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज बचतीसाठी पंखे, फ्रीजची स्वस्तात विक्री

(Representational Image)
(Representational Image)

मुंबईत वीज पुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) ही कंपनी वीज बचतीच्या पंख्यांची त्यांच्या ग्राहकांना विक्री करणार आहे. यामुळे मुंबईकरांची साडेसात मेगावॉट वीज बचत होणार आहे. 

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड ही मुंबईत ३० लाख ग्राहकांना वीज पुरवठा करते. दररोज २ हजार मेगावॉट विजेची मागणी कंपनी पूर्ण करते. कंपनी वीज बचतीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये कंपनीने गेल्या वर्षी वीज बचत करणारे २५ हजार पंखे व ६५०० फ्रिजची स्वस्त दरात विक्री केली होती. आता ५० हजार पंख्यांची पुन्हा विक्री करण्यात येणार आहे. पंख्यावर १७०० रुपयांची सवलत असेल.  हे पंखे 60 टक्के कमी वीज वापरतात.

गेल्या वर्षी कंपनीच्या या योजनेमुळे ७.५० मेगावॉट विजेची बचत झाली होती. वीज ग्राहक १९१२२ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करू शकतील. ग्राहकाचे नाव, एईएमएल ग्राहक क्रमांक व संपर्क माहिती द्यावी लागेल. याखेरीज वेबसाइटवरही नोंद करता येईल.

गेल्या महिन्यात कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये ग्राहक सेल्फ मीटर रिडिंग, ईमेल, एसएमएसद्वारे बिले प्राप्त करणे, वेबसाइटवर किंवा अ‍ॅपद्वारे बिले तपासणे यासारख्या विविध सेवांसाठी डिजिटल पर्यायांचा उपयोग करू शकतात. यामार्फत ऑनलाईन पेमेंट देखील करता येणार आहे. तसंच नवीन कनेक्शनसाठी ग्राहक अर्ज करू शकतात, बिलावर नाव बदलू शकतात आणि इतर बर्‍याच सेवांसाठी ग्राहक डिजिटल प्लॅटफॉर्म वापरू शकतात. 


हेही वाचा -

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार


पुढील बातमी
इतर बातम्या