माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणा (MMRDA)ला दिले होते. त्यानुसार सोमवार २१ सप्टेंबर २०२० रोजी माणकोली उड्डणपूल कुठल्याही औपचारीक उद्घाटन कार्यक्रमाशिवाय वाहतुकीस खुला करून देण्यात आला आहे. (bhiwandi mankoli flyover built by mmrda opens to traffic)

मुंबई- नाशिक महामार्गावरील माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी दुपारी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होतं. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसंच इतर लोकप्रतिनिधी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत दुपारी दीड वाजता हे लोकार्पण ठरलं होतं. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र पहाटे भिवंडी इथं इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसंच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी इथं धाव घेतली व मदतकार्य वेगाने सुरू झालं, त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला.

हेही वाचा- मुंबईतील एमएमआरडीएच्या 'या' प्रकल्पाला उच्च न्यायालयाची स्थगिती

परंतू केवळ अधिकृत उदघाटन झालं नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणं आणि वाहनधारकांची गैरसोय करणं बरोबर नाही, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटनाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्यास सांगितलं. त्यानुसार ही मार्गिका खुली करण्यात आली आहे.

ठाणे-डोंबिवली हे अंतर अर्ध्या तासावर यावं आणि शहरातील वाहतूककोंडी सुटावी या उद्देशाने एमएमआरडीएने हा उड्डणपूल उभारला आहे. डोंबिवली बाजूकडील रेतीबंदर मोठागाव ते भिवंडी बाजूकडील माणकोलीदरम्यानच्या खाडीवर हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

हेही वाचा- भिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत 
पुढील बातमी
इतर बातम्या