Advertisement

भिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत

मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

भिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत
SHARES

भिवंडीतील पटेल कंपाउंड इथली जीलानी ही ३ मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्दैवी घटनेत जवळपास १० जणांनी जीव गमावला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

इमारत कोसळल्याचं कळताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

जवळपास २० जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर भिवंडीतल्या इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एकनाथ शिंदेंनी ढिगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढलेल्या नागरिकांची भिवंडीतल्या इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली.

हेही वाचा : 'जेजे'त रुग्णालयात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प उभारण्यात येणार

सोमवारी पहाटे ३.४० वाजता ही दुर्घटना घडली. यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कमकुवत झाली होती. यामध्ये २१ कुटुंबं राहत होती.

सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळली होती. यात १० जणांचा मृत्यू झाला तर किमान काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेनंतर स्थानिक लोकांनी २० लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ही इमारत ३० वर्षे जुनी होती. आधीच धोकादायक घोषित केलं होतं. दोनदा नोटिसही बजावण्यात आली होती.



हेही वाचा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

मुंबईत मलेरियाचा प्रसार रोखण्यात यश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा