Advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १० सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

 किशोरी पेडणेकर यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या आता कोरोनामुक्त झाल्या असून घरी परतल्या आहेत.  त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. किशोरी पेडणेकर या लॉकडाऊनपासून अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरुन त्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी केईएम, नायर, शताब्दी यासारख्या रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. इतकंच नाही तर स्वत: नर्सचा गणवेष परिधान करुन नायर रुग्णालयात जात तिथल्या कर्मचाऱ्यांचा हुरुपही वाढवला होता.

किशोरी पेडणेकर यांना जून महिन्यात सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ताप आल्याने तपासणीसाठी त्या रुग्णालयात गेल्या असताना उपचारासाठी त्यांना अ‍ॅडमिट करण्यात आले. मात्र, काही दिवसातच प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा