Advertisement

मुंबईत मलेरियाचा प्रसार रोखण्यात यश

ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये मलेरियाचे १ हजार १३७, गॅस्ट्रोचे ५३, लेप्टोचे ४५, हेपॅटायटिसचे १० आणि डेंग्यूचे १० रुग्ण सापडले होते.

मुंबईत मलेरियाचा प्रसार रोखण्यात यश
SHARES
ऑगस्ट (August) महिन्यात मलेरियाचे (Malaria) रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागापुढं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र योग्य ती उपाययोजना करत पालिकेने मलेरियावर नियंत्रण आणण्यात यश मिळवलं आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाचे ११३७ रुग्ण सापडले होते. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ३१७ रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव मुंबईत कमी होत असल्याचं यातून दिसून आलं आहे.

ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये मलेरियाचे १ हजार १३७, गॅस्ट्रोचे ५३, लेप्टोचे ४५, हेपॅटायटिसचे १० आणि डेंग्यूचे १० रुग्ण सापडले होते. १३ सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये मलेरियाचे ३१७ रुग्ण सापडले, तर गॅस्ट्रोचे ४९, लेप्टोचे २४, हेपॅटायटिसचे आठ, डेंग्यूचे पाच आणि स्वाइन फ्ल्यूचा एक रुग्ण सापडला आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. जुलै महिन्यामध्ये मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या ८७२, लेप्टोचे १४, गॅस्ट्रोचे ५३, कावीळचा एक, तर डेंग्यूच्या ११ रुग्णांची नोंद झाली होती.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दीड हजारांवर बेड्सची सोय करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास होऊ नये म्हणून पालिकेकडून फवारणी केली जात आहे. पण, नागरिकांनी पाणी साचू देऊ नये. ताप, डोकेदुखी, उलटी, थकवा अशी काही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

आजार         जुलै       ऑगस्ट     सप्टेंबर

मलेरिया       ८७२      ११३७       ३१७
लेप्टो           १४        ४५         २४
एच१एन१       ०          १           १
गॅस्ट्रो           ५३         ५३         ४९
हेपेटाईटीस       १         १०          ८
डेंग्यू              ११        १०         ५



हेही वाचा -
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू 
मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा