Advertisement

१०६ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात

डोंबिवली पश्चिमेतील आनंदीबाई पाटील या १०६ वर्षांच्या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली.

१०६ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात
SHARES
देशभरात कोरोनाने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. वृद्धांसाठी कोरोना अधिक घातक आहे. मात्र, १०६ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाला हरवू शकतो हा मोठा दिलासा मिळाला आहे. आनंदीबाई पाटील असं या आजीचं नाव असून त्या डोंबिवलीत राहतात.

डोंबिवली पश्चिमेतील आनंदीबाई पाटील या १०६ वर्षांच्या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. मात्र डोंबिवलीतील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, मनपा कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना १३ सप्टेंबर रोजी दाखल करून घेतले. त्यानंतर आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून अवघ्या सात दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना १०६ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिसचार्ज मिळणे ही  सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.हेही वाचा -
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू 
मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय