लसीकरणासाठी २२७ केंद्रे सुरू करण्याची बीएमसीची योजना

लसीकरणासाठी २२७ केंद्रे सुरू करण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. या  केंद्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेता येणार आहे. आगामी काळात लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

मुंबईमधील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मुंबईतील शासकीय आणि पालिकेच्या ६३ लसीकरण केंद्रांमध्ये फक्त ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. तर १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ७३ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांमध्ये लस देण्यात येईल आणि २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक अशी २२७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील, असं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केले आहे. 

सध्या मुंबईतील ७३ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लवकरच खासगी लसीकरण केंद्रांची संख्या १०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे.


हेही वाचा

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?

गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

पुढील बातमी
इतर बातम्या