वर्सोवा-वांद्रे सीलिंकचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार

(Representational Image)
(Representational Image)

वर्सोवा - वांद्रे सीलिंकचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु त्याचे महत्त्वपूर्ण काम पावसाळ्यानंतर म्हणजेच १ ऑक्टोबरपासून सुरू होईल, असे महाराष्ट्र सरकारच्या एका अधिकाऱ्यानं अशी माहिती फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

अधिकाऱ्याने साइटवर यंत्रसामग्री एकत्रीकरणाचे काम कसे सुरू केले आहे ते स्पष्ट केले. परंतु मान्सून जवळ येत असल्यानं काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच कामाला सुरुवात होईल.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (MMB) पावसाळ्यात काम करण्याची जोखीम लक्षात घेऊन समुद्रात काम करण्याची परवानगी देत नाही.

यंत्रसामग्री एकत्रित करण्याचे काम सुरू आहे आणि प्रशासकिय कामाची एकूण प्रगती फक्त २.५ टक्के आहे. हा पूल समुद्रावरून गेल्यानं पावसाळा संपल्यावर कामाला गती येईल, असा अंदाज आहे.

त्यामुळे नवीन कंत्राटदाराला निर्बंध संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी वर्सोवा वांद्रे सी लिंकची अंतिम मुदत डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी नियुक्त केलेल्या दोन कंत्राटदारांना हे कंत्राट अन्य दोन कंपन्यांना देण्यास परवानगी देण्यात आली होती, असा दावा खात्यांनी केला होता.


हेही वाचा

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पालिका लवकरच सायकल ट्रॅक उभारणार

सीएनजीच्या किमतीमुळे टॅक्सी चालकांची लांबच्या पल्ल्यांकडे पाठ

पुढील बातमी
इतर बातम्या