Advertisement

सीएनजीच्या किमतीमुळे टॅक्सी चालकांची लांबच्या पल्ल्यांकडे पाठ

चालक जवळच्या प्रवासाला अधिक प्राधान्य देत आहेत. कारण त्यासाठी कमी इंधन आणि गॅस लागते.

सीएनजीच्या किमतीमुळे टॅक्सी चालकांची लांबच्या पल्ल्यांकडे पाठ
SHARES

टॅक्सी चालक लांबचे भाडे घेण्यास नकार देत आहेत. याचं कारण म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमती ७६ रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत. चालक जवळच्या प्रवासाला अधिक प्राधान्य देत आहेत. कारण त्यासाठी कमी इंधन आणि गॅस लागते.

मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं २ मे रोजी परिवहन विभागाला पत्र लिहून टॅक्सी भाड्यात त्वरित वाढ करण्याची मागणी केली होती. टॅक्सी चालकांच्या म्हणण्यानुसार, सीएनजीच्या दरवाढीमुळे लांबचे भाडे स्विकारणे कठीण झाले आहे.

“सरकारनं सुरुवातीला आम्हाला सीएनजी अधिक किफायतशीर आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही सीएनजीकडे वळलो. पण काही दिवसातच, सीएनजीची किंमत ६० रुपयांवरून ७६ रुपये झाली. आम्ही लहान मार्गांसाठी प्रवासी घेण्यास प्राधान्य देतो कारण प्रत्येक सहलीमागे आम्हाला कमीत कमी रु. २५ मिळतात,” प्रेमनाथ सिंग या टॅक्सी ड्रायव्हरनं फ्री प्रेस जनरलला स्पष्ट केले जे तीन दशकांहून अधिक काळ ड्रायव्हिंग करत आहेत.

युनियननं लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की, '३० एप्रिल रोजी सीएनजीच्या किमतीत ४ रुपये किलोने वाढ करण्यात आली होती जी आता ७६ रुपये प्रति किलो सीएनजी झाली आहे. आम्ही टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी करत आहोत, परंतु मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) याप्रकरणी कोणताही निर्णय घेत नाही.

“गेल्या वर्षापासून सीएनजीच्या दरात किलोमागे २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आमच्या चालकांवर खूप दबाव निर्माण झाला आहे आणि त्यामुळे ते लांब मार्ग चालवण्याबद्दल साशंक आहेत,” ए एल क्वाड्रोस, अनुभवी युनियन लीडर म्हणाले.

सूत्रांनी फ्रि प्रेस जनरलला सांगितलं की, एमएमआरटीएची ९ मे रोजी बैठक अपेक्षित आहे जिथे भाडेवाढीचा निर्णय होऊ शकतो. टॅक्सी संघटनांचा दावा आहे की, एमएमआरटीए आणि राज्य सरकारनं कोणताही निर्णय न घेतल्यास १ जूनपासून ते स्वत:हून जास्त भाडे आकारतील. ते ३० रुपये मूळ भाडे मागत आहेत.

सीएनजीच्या किमतीत सातत्यानं होणारी वाढ लक्षात घेता, टॅक्सी चालकांना दररोज २०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये टॅक्सी भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये, तर ऑटो रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये करण्यात आले होते. तेव्हा सीएनजीची किंमत ४९ रुपये किलो होती. सध्याच्या २१ रुपयांवरून किमान भाडे २४ रुपये करण्याची मागणी ऑटो रिक्षा संघटनांनी केली आहे.हेही वाचा

नवीन इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग पॉइंट अनिवार्य करण्याची पालिकेची योजना

एसी लोकलचा प्रवास आजपासून स्वस्त

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा