Advertisement

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पालिका लवकरच सायकल ट्रॅक उभारणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) यांनी समर्पित सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पालिका लवकरच सायकल ट्रॅक उभारणार
SHARES

आता, ठाणे महापालिका (TMC) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) यांनी समर्पित सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

यासह, केडीएमसीचा पहिला असा समर्पित सायकल ट्रॅक असेल जो रौनक सिटीपासून सुरू होईल आणि सिटी पार्क इथं संपेल. त्यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या सायकलस्वारांना मदत होईल.

KDMC ने, त्याच्या स्मार्ट रोड प्रकल्पाचा एक भाग म्हणून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४.१० km सायकल ट्रॅकचा समावेश केला आहे. सायकलिस्ट संघटनांसोबत या आठवड्यात झालेल्या बैठकीत, प्रशासकिय संस्थेनं सायकल ट्रॅकच्या मूलभूत गरजांबद्दल चर्चा केली. मात्र, अंदाजे किंमत अधिकाऱ्यांनी उघड केलेली नाही.

दरम्यान, TMC ने सिद्धाचल फेज ६ च्या समोर ८५०m-लांब आणि ३.६m-रुंद सायकल ट्रॅकची योजना आखली आहे. ट्रॅक कार्निव्हल हॉटेलच्या बाहेरून सुरू होतो आणि पवार नगर बस स्टॉपवर संपतो. पालिकेच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यापूर्वी ते तयार होईल.

या ट्रॅकसाठी जारी केलेली वर्क ऑर्डर ६९.७६ लाख आहे आणि त्यात तीन वर्षांच्या देखभालीचा समावेश आहे. ट्रॅकवर रंगीत फलक लावण्यात येणार असून कोटिंगही करण्यात येणार आहे. हा भाग पार्किंगसाठी वापरला जाणार नाही अशा प्रकारे बॅरिकेड केले जाईल, असे TMC अधिकाऱ्यांनी सांगितले.

अहवालावर विश्वास ठेवला तर वागळे इस्टेटमध्ये काही वर्षांपूर्वी असाच ट्रॅक विकसित करण्यात आला होता. देखभालीअभावी ही जागा पार्किंगसाठी वापरली जातेय. तथापि, या शहरांमधील सायकलस्वार गट लहान ट्रॅकपेक्षा सायकल ट्रॅक आणि लांब, सुस्थितीत असलेल्या मार्गांची उत्तम कनेक्टिव्हिटी शोधत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अशाच एका उपक्रमात, बोरिवलीतील एका लोकवस्तीच्या रस्त्याचे स्थानिक कॉर्पोरेशनने सायकल ट्रॅकमध्ये रूपांतर केले आहे.

दुसरीकडे, ७ मे पासून कल्याण आणि डोंबिवली शहरातील दोन रस्ते सकाळी ५ ते ८ या वेळेत तीन तास चालण्यासाठी आणि सायकलिंगसाठी समर्पित केले जातील. हे मुंबई पोलिसांच्या “मुंबई स्ट्रीट्स” उपक्रमाचा भाग आहे.

पत्रीपूल ते ठाकुर्ली हा रस्ता (९० फूट रस्ता) आणि गंधारे पूल ते रिंगरोड या रस्त्याची एक बाजू सायकलिंग आणि चालण्यासाठी उपलब्ध असेल, त्यासाठी रस्त्याचे मार्किंग करण्यात आले आहे. या कालावधीत हा रस्ता वाहतुकीस बंद असेल.



हेही वाचा

ठाणे आणि नवी मुंबईतल्या 'या' भागात पाणी पुरवठा बंद

आता पालिका शाळांमध्ये देणार अग्निसुरक्षा आणि बागकामाचे धडे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा