Advertisement

ठाणे आणि नवी मुंबईतल्या 'या' भागात पाणी पुरवठा बंद

पाणी काटकसरीने वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठाणे आणि नवी मुंबईतल्या 'या' भागात पाणी पुरवठा बंद
SHARES

ठाणे आणि नवी मुंबईच येत्या शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. बारवी धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांना शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे.

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि विविध औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद करण्याची परवानगी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मागितली जात होती.

शुक्रवारी (६ मे) दुपारी १२ वाजल्यापासून शनिवारी (७ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी जांभूळ येथील जल केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाच्या उपअभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाढलेलं तापमान पाहता भर उन्हात जलवाहिन्या जोडणीचं काम करणं अशक्य होईल. त्यामुळे हे काम दोन दिवसांत विभागलं आहे. रात्रीच्या वेळीही हे काम सुरू राहणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.हेही वाचा

५ आणि ६ मे ला 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

मुंबई विमानतळावरून बेस्टची २४ तास सेवा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा