गोरेगावच्या वाघेश्वरी मंदिरात लागली आग, अग्निशमन घटनास्थळी दाखल

गोरेगाव इथल्या दिंडोशी पूर्वेकडील वाघेश्वरी मातेच्या मंदिराजवळील लग्नाचं मंडप आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिंडोशी पूर्वेकडील वाघेश्वरी मातेच्या मंदिराजवळ लग्नाचं मंडप बांधण्यात आलं होतं. या आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला आहे.

आगीबाबत सूचना मिळताच अग्निशामकाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तातडीनं आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. अद्याप आग विझविण्याचे काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

आगीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. मंदिराच्या बाजूला सॅटेलाईट इमारत आहे. या इमारतीतले नागिरक देखील घाबरून घराबाहेर आले. अग्निशमन दलानं बऱ्यापैकी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. पण परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.


हेही वाचा

नालासोपारात पोलिसाची ड्युटीवर असतानाच आत्महत्या

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही

पुढील बातमी
इतर बातम्या