Advertisement

नालासोपारात पोलिसाची ड्युटीवर असतानाच आत्महत्या

नालासोपारात पोलीस हवालदाराने ऑन-ड्यूटी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

नालासोपारात पोलिसाची ड्युटीवर असतानाच आत्महत्या
File Image
SHARES

नालासोपारात पोलीस हवालदाराने ऑन-ड्यूटी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यातील या पोलीस हवालदाराने गोळ्या झाडून आपलं आयुष्य संपवलं. 

सखाराम भोये असं या पोलिसाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजताची ही घटना घडली. सखाराम भोये यांनी पोलीस ठाण्यातच गोळी मारून आत्महत्या केली.  घटनेनंतर तात्काळ सखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सखाराम यांनी ऐवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सखाराम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  सखाराम यांनी आत्महत्या का केली याचा तपास सध्या सुरू आहे. यासाठी पोलीस त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.हेही वाचा -

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्हीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा