मेट्रो कारशेड स्थगितीमुळे एमएमआरसीला रोज अडीच कोटींचा तोटा

मेट्रो ३ च्या (Metro 3) आरे काॅलनीतील (aarey Colony) कारशेड (carshed) साठी झालेल्या वृक्षतोडीला मोठा विरोध झाला होता. त्यामुळे कारशेडला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. हे कारशेड कुठे तयार करायचं याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (Mumbai Metro Rail Corporation-एमएमआरसी) रोज अडीच कोटी रुपयांचा तोटा होत आहे. 

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ साठी आरे काॅलनीतील मोठ्या प्रमाणावर झाडं तोडावी लागणार होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ नोव्हेंबर २०१९ रोजी आरेतील कारशेडला (carshed) स्थगिती दिली होती. ही स्थगिती देऊन  आता १०० दिवस उलटून गेले आहेत. कारशेड कोठे करायचे याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे कारशेडशिवाय मेट्रो-३ च्या कामाला विलंब होणार आहे. ज्या वेळी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला त्या वेळी त्याचा खर्च २३ हजार कोटी रुपये इतका होता. आता तो वाढून ३२ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. 

मेट्रो-३ साठी आरेमध्ये ३३ हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते. यासाठी हजारो झाडांचा बळी जाणार होता. त्यामुळ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर वित्त विभागाने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समितीही नेमली होती. ही समिती कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेणार होती. या समितीने कारशेड आरे कॉलनीच्या बाहेर हलविणं अवघड असल्याचं नमूद केलं आहे. आरेमध्ये आधीच वनजमिनीचे कारशेडच्या कामानुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जर हे शेड दुसऱ्या ठिकाणी करायचे झाल्यास या प्रकल्पाला आणखी विलंब लागणार आहे. 


हेही वाचा -

बीकेसीतील प्रदुषणप्रकरणी एमएमआरडीएची ४० कंत्राटदारांना नोटीस

कोरोना व्हायरसबाबत महापालिकेचं अफवा पसरवणारं पोस्टर


पुढील बातमी
इतर बातम्या