Advertisement

कोरोना व्हायरसबाबत महापालिकेचं अफवा पसरवणारं पोस्टर

कोरोना विषाणू (corona virus) बाबत अनेक अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. आता ही भिती आणखी वाढवण्याचं काम मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) केलं आहे.

कोरोना व्हायरसबाबत महापालिकेचं अफवा पसरवणारं पोस्टर
SHARES

कोरोना विषाणू (corona virus) बाबत अनेक अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. आता ही भिती आणखी वाढवण्याचं काम मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) केलं आहे. पाळीव प्राण्यांशी (Pets) असुरक्षित संपर्कामुळे करोना होऊ शकतो, असा इशारा देणारे पोस्टर (poster) मुंबई महापालिकेने लावले होते. हे पोस्टर बघून अनेकांनी कुत्रे, मांजरी यांना सोसायटीच्या आवारातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या पोस्टरमुळे  प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण होते. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मिडीयावर याची चर्चा होऊन पालिकेविरोधात संताप व्यक्त केला गेला. त्यामुळे अखेरीस पालिकेने हे पोस्टर काढून टाकले. 

पालिकेने लावलेल्या पोस्टरवर म्हटलं होतं की,  आपण कोरोनाचा (corona virus) प्रसार थांबवू शकतो, असे सांगत वन्यजीव आणि शेतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या प्राण्यांशी असुरक्षित संपर्क टाळा. या पोस्टरवर फोटो कुत्र्याचा लावला होता. तसंच पोस्टरवर जागतिक आरोग्य संघटनेचं चिन्ह होतं. त्यामुळे या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला. या पोस्टरसंदर्भात ठाणे विभागाचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधून चुकीची माहिती लोकांना देण्यात येऊ नये अशी विनंती केली. त्यानंतर पालिकेने हे पोस्टर उतरवले. 

अनेकांनी जागितक आरोग्य संघटनेकडे यासंदर्भात चौकशी केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील शाखेतर्फे अशा पद्धतीच्या कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगितलं. याबाबत काही नागरिकांनी सोशल मीडियावर स्पष्ट करण्याचा आणि पाळीव तसेच शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या प्राण्यांबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पाळीव प्राणी, शेतीवापरासाठी उपयोगात येणाऱ्या प्राण्यांबद्दल चुकीची माहिती देऊन करोनाची भीती निर्माण करण्याचे काम हे पोस्टर करत असल्याबद्दल अनेक प्राणीतज्ज्ञांनी नाराजी वर्तवली. महापालिकेनेहे पोस्टर हटवल्याने तसेच प्राणीतज्ज्ञांकडूनही यासंदर्भातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याने पाळीव प्राणी, कुत्रे, मांजरी यांना कोरोनाच्या भीतीने त्रास देण्यात येऊ नये, असे आवाहन प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे. हेही वाचा -

राज्यसभेसाठी शरद पवार आणि फौजिया खान आज अर्ज भरणार

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा