Advertisement

राज्यसभेसाठी शरद पवार आणि फौजिया खान आज अर्ज भरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माजिद मेमन यांचा कार्यकाळही पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी फौजिया खान यांना संधी देण्याचा निर्णय

राज्यसभेसाठी शरद पवार आणि फौजिया खान आज अर्ज भरणार
SHARES

राज्यसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान अर्ज भरणार आहेत. येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे दोन नेते अर्ज दाखल करतील. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. तर राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माजिद मेमन यांचा कार्यकाळही पूर्ण होत आहे. यावेळी त्यांच्या जागी फौजिया खान यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शरद पवार आणि फौजीया खान हे आज मुंबईतील विधानभवनात आपले अर्ज दाखल करतील.

हेही वाचाः- ​मुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार​​​

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार १३ मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेनं मात्र नावांची घोषणा केली नाही. पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचाः- मुंबईकरांना लवकरच होणार उन्हाळ्याची जाणीव

भाजपाच्या रिक्त होणाऱ्या दोन जागांपैकी एका जागेसाठी रामदास आठवले यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून आज भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची घोषणाही आज होणार आहे. भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित मानलं जात असलं, तरी अधिकृत उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा