Advertisement

मुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार

'कोरोना' व्हायरसच्या (Corona Virus) भितीमुळं मुंबईतील अनेक जणांनी यंदा धुळवड खेळणं टाळलं.

मुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार
SHARES

'कोरोना' व्हायरसच्या (Corona Virus) भितीमुळं मुंबईतील अनेक जणांनी यंदा धुळवड खेळणं टाळलं. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यानं खबरदारी म्हणून पाण्यानं धुळवड खेळणंही टाळलं. परंतु, यंदाची होळी (Holi) ही करोनाच्या सावटाखाली साजरी होत असताना मुंबईत तब्बल ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या तिन्ही (BMC Hospital) प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. केईएममध्ये ९ जणांवर, नायरमध्ये ६ आणि लो. टिळक रुग्णालयामध्ये एकूण २३ जणांवर उपचार करण्यात आले.

महापालिकेच्या (BMC) केईएममध्ये एकावर अद्याप उपचार सुरू आहेत. जे. जे. रुग्णालयामध्ये १२ जखमी आले होते, त्यामधील दोघांना दाखल करून घेण्यात आलं असून, इतरांना पडल्यामुळं जखमा झाल्या असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. डोके, हातापायाला दुखापत, हनुवटीला मार, डोळ्याला दुखापत आणि भाजण्याच्या कारणामुळे ३८ जणांवर महापालिका रुग्णालयांमध्ये (BMC Hospital) उपचार करण्यात आले.

नायर आणि लो. टिळक रुग्णालयामध्ये प्रत्येकाला ओपीडीमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळते. या जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. लो. टिळक रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या २३ जखमींमध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. केईएममध्ये ५ मुलांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

करोनाच्या (Corona) भितीमुळं विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असताना होळी व धुलिवंदन सणाला आणि पर्यायाने या सणांवर अवलंबून असलेल्या हंगामी व्यावसायांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागल. मुंबईतील अनेक भागांत करोनाच्या पार्श्वभूमीवर पाण्याने धुळवड न खेळण्यावरच भर दिल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी फक्त रंगाच्या मदतीने या सणाचा आनंद घेतला गेला. एकूणच यंदाची होळी, धुलिवंदन करोनाला घाबरतच साजरे झालेले पाहायला मिळाले.

सध्या जगभरात करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या सूचनावलीत एखाद्या ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचनेचाही समावेश आहे. यामुळे मुंबईत दरवर्षी दिसणारा उत्साह यंदा दिसला नाही. काही ठराविक भागांत पाण्याने धुळवड खेळण्यात आली. लहान मुलांना प्राधान्याने धुळवडीपासून लांब ठेवण्यात आले.



हेही वाचा -

'कोरोना'चे सहा प्रवासी मुंबईतील कस्तुरबामध्ये दाखल

YES बँकेनं सुरू केली NEFT, IMPS सेवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा