Advertisement

YES बँकेनं सुरू केली NEFT, IMPS सेवा

येस बँकेच्या खातेदारकांसाटी दिलासादायक बातमी समोर आली आहे. IMPS आणि NEFT या सेवा पुन्हा सुरु केल्या आहेत.

YES बँकेनं सुरू केली NEFT, IMPS सेवा
SHARES

रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर नेट बँकिंग, मोबाईल अॅप, डेबिट-क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि ATM या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. तसंच मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही बंद होत्या. Google Play, Phone Play यांसारख्या मोबाईल वॉलेट्स मधूनही येस बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नव्हते. पण आता येस बँकेच्या खातेदारकांसाटी दिलासादायक बातमी समोर आली आहे.


ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी

येस बँकेनं एटीएम पाठोपाठ आपल्या इमिजिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात IMPS आणि NEFT या सेवा पुन्हा सुरु केल्या आहेत. याची माहिती येस बँकेनं ट्विट करत ग्राहकांना दिली आहे. त्यानुसार बँकेची IMPS/NEFT कार्यरत झाली आहेत. या सेवांच्या माध्यमातून खातेदार आर्थिक व्यवहार करु शकतात. तसंच कर्जाचे हप्तेही फेडू शकतील

यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा वापरही करता येईल. हे कार्ड ग्राहक येस बँकेच्या एटीएममध्ये किंवा अन्य बँकांच्या एटीएममध्येही वापरु शकतील, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच सहकार्य केल्याबद्दल ग्राहकांचे आभारही मानले आहेत.


५० हजार रुपये काढता येणार

येस बँक अनेक दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होती. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी येस बँकेच्या व्यवस्थापनाशी आरबीआय सातत्यानं चर्चा करत होती. मात्र बँकेची सातत्यानं ढासळत जाणारी आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं ५ मार्च रोजी बँकेवर निर्बंध लागू केले. त्यानुसार महिन्याभरात खातेदारांना केवळ ५० हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. हे निर्बंध ३ एप्रिल पर्यंत बँकेवर असणार आहेत


IMPS/NEFT सेवा कार्यरत

रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधनांनंतर ATM मध्ये खळखळाट पाहायला मिळाला. मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही ठप्प करण्यात आल्या त्यामुळे खातेदारांची चिंता अधिकच वाढली होती. दरम्यान, रविवारी बँकेनं ATM सेवा पुन्हा सुरू करुन खातेदारांना दिलासा दिला होता. त्यानंतर आज बँकेनं IMPS/NEFT सेवा कार्यरत केली आहे.



हेही वाचा

वर्षभरात 'या' बँकांमध्ये १ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे घोटाळे, वाचाल तर चक्रावून जाल... 

कोरोना व्हायरसचा 'कोरोना बिअर' व्यवसायावर परिणाम


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा