Advertisement

मुंबईकरांना लवकरच होणार उन्हाळ्याची जाणीव

मुंबईकरांना उन्हाळ्याची जाणीव १५ किंवा १६ मार्चनंतर होऊ शकते आणि त्यावेळी मुंबईचं तापमान ३४ अंशांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबईकरांना लवकरच होणार उन्हाळ्याची जाणीव
SHARES

मुंबईकरांना उन्हाळ्याची (Summer) जाणीव लवकरच होणार आहे. मुंबईत सध्या अजूनही सकाळच्या वेळी तीव्र उन्हाची जाणीव व्हायला सुरुवात झालेली नाही. परंतु, असं असलं तरी मुंबईकरांना उन्हाळ्याची जाणीव १५ किंवा १६ मार्चनंतर होऊ शकते आणि त्यावेळी मुंबईचं तापमान (Mumbai Temperature) ३४ अंशांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मंगळवारी कमाल तापमान (Maximum Temperature) सरासरीपेक्षा कमी होतं. सांताक्रूझ इथं ३०.५, तर कुलाबा इथं ३०.४ अंश कमाल तापमान नोंदवलं गेलं. किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ होऊन सांताक्रूझ इथं २१.१, तर कुलाबा इथं २२.० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. मंगळवारी दुपारी वाऱ्यांचा वेग नसल्यानं दुपारी काही प्रमाणात उकडा जाणवला. मात्र, नंतर समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही उकाड्याची जाणीव नियंत्रणात आली.

येत्या ४८ तासांपर्यंत असे दिलासादायक तापमान अनुभवता येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात हळुहळू वाढ होणार असल्याचं प्रादेशिक हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईव्यतिरिक्त राज्यभरात कमाल तापमानाचा पारा अजूनही सरासरीपेक्षा खाली आहे. पुण्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी कमी होते. पुण्याच्या तापमानाचा पारा ३०.६ अंशांवर होता.

नाशिक इथंही कमाल तापमान सरासरीपेक्षा ७ अंशांनी कमी होतं. नाशिकचं कमाल तापमान २७.४ अंश होतं. तर गोंदिया इथं कमाल तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी कमी नोंदलं गेलं. गोंदियाचं कमाल तापमान २७ अंश होतं. दिवसभरात सर्वात जास्त कमाल तापमान मंगळवारी सोलापूर इथं ३६.८ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं, तर सर्वात कमी किमान तापमान पुणे इथं १५.५ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं.


हेही वाचा -

'कोरोना'चे सहा प्रवासी मुंबईतील कस्तुरबामध्ये दाखल

मुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा