Advertisement

बीकेसीतील प्रदुषणप्रकरणी एमएमआरडीएची ४० कंत्राटदारांना नोटीस

वांद्रे-कुर्ला संकुलातील (bandra kurla complex - बीकेसी) प्रदूषणप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (mmrda- एमएमआरडीए) ४० कंत्राटदारांना (contractor) नोटीस (notice) पाठवली आहे.

बीकेसीतील प्रदुषणप्रकरणी एमएमआरडीएची ४० कंत्राटदारांना नोटीस
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुलातील (bandra kurla complex - बीकेसी) प्रदूषणप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (mmrda- एमएमआरडीए) ४० कंत्राटदारांना (contractor) नोटीस (notice) पाठवली आहे. या कंत्राटदारांना १ ते ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात हवेचा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश वेळा वाईट ते अतिवाईट स्तरावर असतो. येथील प्रदूषण (pollution) रोखण्यासाठी एमएमआरडीएने दंडात्मक कारवाईचे निर्देश डिसेंबरअखेरीस जारी केले होते. 

 वांद्रे-कुर्ला संकुलात उन्नत मेट्रो, भुयारी मेट्रो, उड्डाणपूल, मेट्रो कास्टिंग यार्ड अशी अनेक कामे सुरू आहेत. या कामांमुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. बऱ्याचदा येथील प्रदुषणाची पातळी अतिवाईट असते.  एमएमआरडीए (mmrda) च्या २६ डिसेंबरच्या आढावा बैठकीत महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रदूषण (pollution) रोखण्यासाठी निर्देश जारी केले होते. या निर्देशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा वापर करणे, बांधकाम ठिकाणाहून बाहेर पडताना वाहनांचे टायर्स स्वच्छ करणे अशा सूचना केल्या होत्या. याचं उल्लंघन करणाऱ्यास दररोज ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मात्र, मागील २ महिन्यात अनेक वाहनांनी निर्देशांचंं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे एमएमआरडीएने वाहनांची छायाचित्रे सोबत जोडून कंत्राटदारांना ४० नोटीसा पाठवल्या आहेत.   मेट्रो मार्गिका, भुयारी मार्गाचे कंत्राटदार यांचा यामध्ये समावेश आहे.  

एमएमआरडीए मैदानातील कार्यक्रमांसाठी केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या बांधकामानंतर साचलेला कचरा हटवला नाही तर अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय बेकायदा पार्किंग आणि संकुलातील हॉटेलमधील वाहने दुसऱ्या मार्गिकेत आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रदूषणाचे मोजमाप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि हवामान विभागाची सफर अशा दोन्ही यंत्रणा करतात. मात्र दोन्ही यंत्रणांची उपकरणे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सफरच्या आकडेवारीनुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश वेळा वाईट ते अतिवाईट स्तरावर असतो, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कलानगर येथील यंत्रणा समाधारक स्तर दर्शविते.


हेही वाचा -

राज्यसभेसाठी शरद पवार आणि फौजिया खान आज अर्ज भरणार

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणारसंबंधित विषय