मुंबईतल्या 'या' ठिकाणी तयार होणार नवीन सायकलिंग ट्रॅक

Representative image
Representative image

कलानगर ते वाकोला दरम्यान एक  सायकलिंग ट्रॅक बनवण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) २१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबवणार आहे. त्यासाठी त्यांनी निविदा मागवल्या आहेत. यात पादचारी पदपथ आणि ट्रॅकच्या बाजूला हिरवीगार झाडं देखील समाविष्ट असतील.

हा प्रकल्प महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ठाकरे म्हणाले होते की, MMRDA वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) प्रमाणेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) वर सायकल ट्रॅक विकसित करण्यात येईल.

मेट्रोपॉलिटन कमिशनर एसव्हीआर श्रीनिवास यांनी ‘मिड-डे’शी बोलताना सांगितलं की, २.५ किमीच्या डेडिकेटेड सायकलिंग ट्रॅकचा पहिला टप्पा तीन मीटर रुंद असेल. ज्या ठिकाणी सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे त्या भागाचं सुशोभिकरण देखील करण्यात येणार आहे. ते प्रवाशांसाठी आवश्यक असे फूटपाथ देखील उपलब्ध करून देतील.

निविदाधारकांना सोमवार, १३ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पासाठी बोली लावावी लागेल. प्रकल्पासाठी कोणाची नियुक्ती होईल, त्याला सहा महिन्यांत प्रकल्प पूर्ण करून वर्षभर त्याची देखभाल करावी लागेल. WEH च्या उत्तरेकडील भागाच्या डावीकडे कलानगर आणि वाकोला दरम्यान सायकल ट्रॅक बांधला जाईल.


हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड : पुढच्या वर्षी दुहेरी बोगद्याचे काम सुरू होण्याची शक्यता

ट्राफिकमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार, 'हे' आहे कारण

पुढील बातमी
इतर बातम्या