Advertisement

ट्राफिकमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार, 'हे' आहे कारण

काही दिवसांसाठी मुंबईकरांना अधिक ट्रॅफिक जामला सामोरं जावं लागणार आहे.

ट्राफिकमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार, 'हे' आहे कारण
SHARES

पुन्हा एकदा मुंबईतील रस्त्यांची डागडुजी होणार आहे. आणि यावेळी ते पेव्हर ब्लॉक्सपासून सिमेंट काँक्रीटमध्ये बदलले जातील. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अनेक रस्ते पेव्हर ब्लॉकने दुरुस्त करण्यात आले होते. त्यामूळे काही दिवसांसाठी मुंबईकरांना अधिक ट्रॅफिक जामला सामोरं जावं लागणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच शहरातील ८०८ रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करत आहे. ज्यासाठी मुंबईत काही रस्त्यांची वाहतूक वळवण्यात येणाची शक्यता आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, या महिन्याच्या अखेरीस २ हजार २०० कोटी रूपयांचं हे कॉन्ट्रॅक्ट निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे. ज्यानंतर कामाला सुरूवात केली जाईल.

प्रस्तावित रस्ते दुरुस्तीचे काम संपूर्ण मुंबई शहरात, पश्चिम आणि पूर्व उपनगरांसह लहान आणि मोठे रस्ते मिळून एकूण ८०८ रस्त्याावर केलं जाणार आहे.

यामध्ये दक्षिण मुंबईतील कुंबाला हिल लेन, कामाठीपुरा १०वी लेन, कामराज नगर रोड, पूर्व उपनगरातील रमाबाई रोड आणि मिलिटरी कॅम्प जंक्शन, कलिना नवपाडा रोड, वांद्रे पूर्व, शास्त्री नगर रोड, पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्व आरे कॉलनी रोड यांचा समावेश आहे.

पालिका शहरातील सर्व पेव्हर ब्लॉक/डांबरापासूनचे रस्ते सिमेंट-काँक्रीटमध्ये करणार आहे. महिना अखेरीस स्थायी समितीकडे या प्रस्ताव मंजुरीसाठी सादर कराण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रशासन रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल आणि मजबुतीकरणासाठी पेव्हर ब्लॉक/डांबरापासून ते सिमेंट आणि काँक्रीटमध्ये रूपांतरित करणार आहे. ते यासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती करतील. जो मुंबई वाहतूक पोलिसांकडून मंजुरीसाठी असेल. कंत्राटदाराला बांधकाम टप्प्यात सुरक्षा बॅरिकेड्स बसवण्यासह वाहतूक व्यवस्थापित करावी लागेल. बांधकाम कालावधी एक वर्ष ते दोन वर्षांपर्यंत असेल.

दरम्यान मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणानं (MMRDA) ईस्टर्न फ्रीवे (Eastern Freeway) ठाणेपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते ठाणे प्रवास करणाऱ्यांना याचा चांगलाच फायदा होईल. सध्या ईस्टर्न फ्रीवे चेंबूरला संपतो. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा औपचारिक निर्णय घेण्यात आला.



हेही वाचा

पवई तलावाजवळील सायकल ट्रॅक प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती

मुंबईतील ९०% पेक्षा जास्त कोविड-१९ बेड रिकामे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा