Advertisement

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड : पुढच्या वर्षी दुहेरी बोगद्याचे काम सुरू होण्याची शक्यता

दुहेरी बोगद्याच्या कामाला वेळ लागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड : पुढच्या वर्षी दुहेरी बोगद्याचे काम सुरू होण्याची शक्यता
SHARES

गोरेगाव मुलुंड लिंक रोड (GMLR) भूमिगत बोगद्याचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) २०२२च्या मध्यापर्यंत सुरू करेल अशी अपेक्षा आहे.

दुहेरी बोगद्याच्या कामाला वेळ लागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांना दोन उड्डाणपुलांनी जोडण्याचा प्रकल्प येत्या दोन महिन्यांत सुरू होईल.

सध्‍या, हा प्रकल्प निविदेच्‍या प्रगत टप्‍प्‍यात आहे. निविदांची छाननी सुरू आहे. पुढील वर्षी जेव्हा काम सुरू होईल, तेव्हा प्रकल्प २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची सुरुवातीची एकूण किंमत ६००० कोटींपेक्षा जास्त आहे. तथापि, प्रकल्प दोन वर्षांच्या निविदा टप्प्यावर असल्यानं खर्च वाढू शकतो.

प्रशासकिय संस्थेनं ४.७५ किमी लांबीचे बोगदे प्रस्तावित केले आहेत जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) अंतर्गत सुरू राहतील. या बोगद्यांमुळे सुमारे १९.४३ हेक्टर आरक्षित वनक्षेत्र प्रभावित होईल.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानानं बोगदे खोदले जातील. येत्या काही महिन्यांत ते GMLR बोगद्यांसाठी निविदांना अंतिम स्वरूप देतील. सध्या निविदा प्रगत टप्प्यावर आहेत, असं अतिरिक्त नागरी आयुक्त पी वेलरासू म्हणाले.

जीएमएलआर प्रकल्पासाठी, पालिकेनं कोरिया, जपान, चीन, हाँगकाँग आणि इतर ठिकाणच्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. तर चिनी कंपन्यांना प्रकल्पासाठी बोली लावण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.



हेही वाचा

ट्राफिकमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार, 'हे' आहे कारण

मुंबई सेंट्रल स्थानकात पहिले 'पॉड हॉटेल' सुरू, 'अशी' आहे सुविधा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा