महाराष्ट्रात बुलेट ट्रेन २०२२ पर्यंत रुळावर धावण्याची शक्यता

(Representational Image)
(Representational Image)

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील पहिला आंतर-राज्य हाय-स्पीड बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्प अखेर रुळावर येऊ शकतो.

सोमवारी २७ डिसेंबर रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आढावा घेऊन २०२२च्या पहिल्या सहामाहीत तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दोन्ही बुलेट ट्रेन मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते पुणे दरम्यान धावणार आहे. प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या उद्देशानं प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या टीमनं नुकतेच दानवे यांना दोन्ही प्रकल्पांचे प्रेझेंटेशन दिले. त्यांनी दानवे यांना या प्रक्रियेला गती देण्यास सांगितलं.

सादरीकरणादरम्यान, अधिकाऱ्यानं सांगितलं की, ७६७ किमी लांबीचा मुंबई नागपूर प्रकल्प नवीन समृद्धी कॉरिडॉरच्या समांतर असेल. यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी १४ तासांवरून केवळ चार तासांवर येईल. मुंबई-पुणे कॉरिडॉरचा प्रवासाचा कालावधी तीन तासांवरून ९० मिनिटांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रासाठी दोन कॉरिडॉर-मुंबई-नाशिक-नागपूर हाय-स्पीड रेल्वे आणि मुंबई-पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर— प्रस्तावित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सरासरी २५० किमी प्रतितास वेगानं गाड्या ३०० किमी प्रतितास वेगानं धावतील. शिवाय, ट्रेनची क्षमता ७५० प्रवासी असेल.

दरम्यान, प्रकल्पाची किंमत अद्याप ठरलेली नाही आणि ती भूसंपादन प्रक्रियेवर अवलंबून असेल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील इतर हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये दिल्ली-वाराणसी (८६५ किमी), दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी), चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी), दिल्ली-अमृतसर (४५९ किमी) आणि वाराणसी-हावडा (७६० किमी) यांचा समावेश होतो.


हेही वाचा

मोनो रेल्वेच्या स्थानकांच्या छतावर सोलर पॅनेल

नव्या वर्षांत टॅक्सींच्या छतावर 'रुफ लाइट इंडिकेटर'

पुढील बातमी
इतर बातम्या