Advertisement

मोनो रेल्वेच्या स्थानकांच्या छतावर सोलर पॅनेल

सौर'ऊर्जेमुळं मोनो रेल्वे स्थानकाच्या विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न आहे.

मोनो रेल्वेच्या स्थानकांच्या छतावर सोलर पॅनेल
SHARES

मुंबईतील मोनो रेल्वेच्या स्थानकांच्या छतावर सोलर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून २ मेगावॉट सौरविजेची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. ही ऊर्जा स्थानकांवरच वापरली जाणार आहे.

सौर'ऊर्जेमुळं मोनो रेल्वे स्थानकाच्या विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न आहे. मोनो रेल्वेच्या १६ स्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून २ मेगावॉट सौरऊर्जा निर्माण होईल, अशी एमएमआरडीएला अपेक्षा आहे.

नियुक्त केलेल्या कंपनीला हे सोलर पॅनेल बसवावे लागणार आहेत. तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती करावी लागणार आहे. पुढील २५ वर्षांसाठी हे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी कंत्राटदार नियुक्तीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा मागविल्या आहेत.

स्थानकांवर बसविलेल्या सौर पॅनेलद्वारे निर्माण झालेली ऊर्जा मोनो स्थानकांवरच वापरली जाणार आहे. तसंच अतिरिक्त ऊर्जा ही ग्रीडला दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७ कोटी ८१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा