छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाल १ वर्षांची मुदतवाढ

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या बांधकामाची मुदत १८ ऑक्टोबर रोजी संपली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागानं (पीडब्ल्यूडी) आता कोणत्याही खर्चात वाढ न करता या प्रकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

हा प्रकल्प सुरुवातीला तीन वर्षांचा होता जो १८ ऑक्टोबरला संपला. रिपोर्टनुसार, पीडब्ल्यूडीनं लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) बरोबर २ हजार ८०० कोटी रुपयांमध्ये करार केला होता. सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी २०१९ मध्ये एका याचिकेवर सुनावणी करताना, स्टॉप-वर्क नोटीस जाहीर केली होती. त्यात राज्य सरकारला बांधकाम कार्यात पुढे न जाण्याचे निर्देश दिले होते.

पीडब्ल्यूडीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक विभागानं प्रस्तावित केलं आहे की, जानेवारी २०१९ पासून हे काम थांबलेलं आहे. कंत्राटदारानं प्रकल्पावर फार कमी काम केलं आहे; म्हणून, मुदतवाढ देणं आवश्यक आहे. बांधकामाचे शंभर टक्के काम अद्याप बाकी आहे, असं विभागानं सांगितलं. ते पुढे म्हणाले की, समुद्रातील काम अद्याप प्रलंबित आहे आणि कंत्राटदाराला कोणतेही पैसे दिले जात नाहीत.

स्मारकाची उंची २१२ मीटर असेल. तर पायथ्याशी १२३.२ मीटरची अश्वारूढ मूर्ती असेल. २०१६ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे 'जलपूजन' केलं होतं.


हेही वाचा

मराठी भाषा भवन मुंबईत उभारलं जाणार

मुंबईतील 'या' ठिकाणच्या फुटपाथचे होणार सुशोभिकरण

पुढील बातमी
इतर बातम्या