Advertisement

मुंबईतील 'या' ठिकाणच्या फुटपाथचे होणार सुशोभिकरण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) योजनेनुसार मध्य मुंबईसह शहरात सुमारे ९० किलोमीटर लांबीच्या फुटपाथचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

मुंबईतील 'या' ठिकाणच्या फुटपाथचे होणार सुशोभिकरण
SHARES

मुंबईसह उपनगरात वाहनांची गर्दी प्रचंड वाढली असून, या गर्दीतून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरं जाव लागतं. तसंच, रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला फुटपाथ तयार करण्यात आले आहेत, ज्यावरून नागरिक व्यवस्थित चालू शकतील. मात्र, सद्दस्थितीत मुंबईतील फुटपाथांची अवस्था पाहिल्यास यावरून चालणं नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. मुंबईतील फुटपाथ तयार करण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आला. मात्र हे पेव्हर ब्लॉक सध्या वर-खाली अवस्थेत असल्यानं चाकरमान्यांना पायाला ठेच लागणं, पाय लचकणं, मुरगळणं अशा समस्यांना तोंड द्याव लागतं आहे. त्यामुळं या चाकरमान्यांचा हा त्रासातून मुक्त करण्यासाठी आता सिमेंट कॉंक्रीटचे फुटपाथ तयार केले जाणार आहेत. जे सरळ व चालण्यास योग्य असणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) योजनेनुसार मध्य मुंबईसह शहरात सुमारे ९० किलोमीटर लांबीच्या फुटपाथचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी सिमेंट कॉंक्रीटचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय, यापुर्वी लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स काढून त्याठिकाणी सिमेंट कॉंक्रीटचे फुटपाथ तयार केले जाणार आहे. शहरातील ३३ ठिकाणं महापालिकेनं निश्चित केली असून, या ठिकाणच्या फुटपाथाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार, दादर, चर्चगेट, मरिन लाइन्स, कुलाबा, केम्स कॉर्नर, वाळकेश्वर या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

या पदपथांवरील पेव्हर ब्लॉकमुळं उद्भवणाऱ्या समस्यांमुळं पालिकेला जनतेच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं महापालिकेनं हे पेव्हर ब्लॉककढून सिमेंट कॉंक्रीटचे फुटपाथ बनविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यासाठी महापिलकेनं प्रकल्प तयार केला असून, या प्रकल्पाअंतर्गत, रस्त्याचा पृष्ठभाग सिमेंटचा बनवला जाणार आहे, जो सर्वसमान्यांसह अपंग नागरिकांसाठीही सोयीस्कर ठरेल. या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कंत्राटदारांसाठी निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे.हेही वाचा -

मुंबईत बेस्टची बस सेवा बंद, महाराष्ट्र बंदचा परिणाम

Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा