Advertisement

मुंबईत बेस्टची बस सेवा बंद, महाराष्ट्र बंदचा परिणाम

बसेसचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे चाकरमान्यांनो घराबाहेर पडण्याआधी हे नक्की वाचा...

मुंबईत बेस्टची बस सेवा बंद, महाराष्ट्र बंदचा परिणाम
file photo
SHARES

महाराष्ट्र बंदमध्ये (Maharashtra bandh) मुंबई आणि उपनगरामधील मुंबईतील बेस्ट बसची (best bus) सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यासोबतच ठाणे परिवहन सेवा (TMT) बंद राहणार आहे. 

वरळी डेपो, वडाळ्यातील प्रतिक्षानगर डेपो आणि अशा बऱ्याच डेपोमधूनबस बाहेर पडल्या नाहीत. बस बंद असल्यानं अनेक प्रवाशांनी डेपोत गर्दी केली आहे. 

तर महाराष्ट्र बंदचा (Maharashtra Bandh) परिणाम बेस्टच्या सेवेवर झालेला पाहायला मिळतोच आहे. यासोबतच मालाडच्या मालवणी परिसरात सकाळी एका बसची तोडफोड करण्यात आल्याचं वृत्त आहे. तोडफोड केलेल्या बसची संख्या ९ वर गेल्याची माहिती मिळतेय. 

मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

बेस्ट बसची झालेली तोडफोड पाहता बेस्टकडून पोलिस सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांचं संरक्षण मिळाल्यावर नियमित बसेस चालवल्या जातील, अशी माहिती मनोज व्हराडे यांनी दिली आहे. 


बेस्ट बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली.ऑफिस गाठण्यासाठी रिक्षा, टॅक्सीकडे प्रवाशांनी धाव घेतली. पण याचा फायदा घेत अनेक ठिकाणी टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेस्ट (Mumbai best bus update) सेवेवर परिणाम झालेला आहे. 

बंदमुळे (maharashtra bandh live update) शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेस्टची सेवा बंद आहे. 

तर दुसरीकडे, बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असा शासनाचा निर्णय असताना बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही. बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करून राज्य सरकारच्या निर्णयाचं उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.

अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा अधिकार बेस्ट कामगार सेनेला कुणी दिला. कामगारांच्या अधिकारासाठी बंद पुकारला तर कारवाई होते. मग आता बंद केला तर कारवाई होणार नाही, याची खात्री सुहास सामंत देणार का? असा सवालही राव यांनी विचारला.

लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं महाराष्ट्र बंदची उद्या हाक दिली आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र बंद! जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

महाराष्ट्र बंदमध्ये ‘ही’ व्यापारी संघटना नाही होणार सहभागी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा