या ७ प्रसिद्ध ब्रँडची पूर्ण नावं वाचून अचंबित व्हाल

एखाद्या ब्रँडला ओळख ही त्याच्या नावावरून मिळते. अर्थात हे नाव किंवा ब्रँड एका उंचीवर नेण्यासाठी अनेकांची मेहनत असते. तुमचा ब्रँड तुम्ही दिलेल्या नावावरून ओळखला जातो. ग्राहकांच्या लक्षात राहावं यासाठी नाव लहानच ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं. मोठं नाव असेल तर लोकांच्या लक्षात राहिलच असं नाही. म्हणून कंपनीदेखील स्वत:च्या ब्रँडचं नाव लहान म्हणजेच शॉर्ट करतात. आम्ही तुम्हाला अशाच काही ब्रँडची नावं सांगणार आहोत ज्यांची खरी नावं वाचून शॉक व्हाल. आज या कंपन्या त्यांच्या शॉर्ट नेम्सनं ओळखली जातात.

१) अमुल

दुध, दही, आईस्क्रिम अशा डेअरी प्रोडक्टसाठी अमुल प्रसिद्ध कंपनी आहे. १४ डिसेंबर १९४६ साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. अमुल या नावानं जरी हा ब्रँड प्रसिद्ध असला तरी याचं पूर्ण नाव वेगळचं आहे. आणंद मिल्क युनियन लिमिटेड हे अमुलचं पूर्ण नाव आहे.

२) बीएमडब्ल्यू

बीएमडब्ल्यू ही जर्मन कंपनी असून आलिशान कार आणि बाईक बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. ७ मार्च १९१६ साली या कंपनीची स्थापना करण्यात आली. रॅप मोटोरेन वेर्के यांच्या नावावरून बीएमडब्ल्यू हे नाव ठेवण्यात आलं. बेरीस्चे मोटोरेन वेर्के हा बीएमडब्ल्यूचा फूलफॉर्म आहे.

३) सीआट (CEAT)

तुमच्यापैकी अनेकांच्या बाईकचे, कारचे किंवा सायकलचे टायर आणि ट्युब या सीआट कंपनीच्या आहेत. टायर आणि टायरमध्ये असणाऱ्या ट्युबसाठी सीआट कंपनी प्रसिद्ध आहे. १९५८ साली सीआटची स्थापना करण्यात आली. विर्जीनियो ब्रृनी टेडेसी यां व्यक्तीनं इटलीत या कंपनीची स्थापना केली. कॅवी इलेक्ट्रिसी ईफिनि टोरीनो असं सिआटचं पूर्ण नाव आहे.

४) सीएनएन (CNN)

सीएनएन (CNN)) ही अमेरिकेतील बातम्या पुरवणारी एक दूरचित्रवाणी केबल वाहिनी आहे. १ जून १९८० साली स्थापन झालेली सीएनएन ही २४ तास बातम्या पुरवणारी जगातील पहिली दूरचित्रवाहिनी होती. अमेरिकेतील एकूण १० कोटी घरांमध्ये सीएनएन वाहिनी दिसते. सीएनएन इंटरनॅशनल ही सीएनएनची आंतरराष्ट्रीय वाहिनी जगातील २५२ देशांमध्ये प्रसारीत होते.

५) इंटेल (intel)

 अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा शहरात इंटेल ही कंपनी आहे. इंटेल ही जगातील संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. इंटेलची स्थापना १८ जून १९६८ रोजी झाली. ही कंपनी मायक्रो प्रोसेसर प्रमाणेच फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड याचे उत्पादन कंपनी करते. इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स हे इंटेल कंपनीचं पूर्ण नाव आहे.

६) एलजी

टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशिन्स एलजीचे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टस प्रसिद्ध आहेत. १९५८ मध्ये दक्षिण कोरीयात या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. लकी गोल्डस्टार हे एलजीचं पूर्ण नाव आहे.

७) विप्रो (WIPRO)

विप्रो ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कॉर्पोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. विप्रो कॉर्पोरेशनची सुरुवात अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी १९४७ साली वनस्पतीजन्य, साबण वगैरे तत्सम गृहोपयोगी उत्पादनापासून सुरु केली. १९६६ साली वडिलांच्या निधनानंतर २१ व्या वर्षी अझीम प्रेमजी यांना उद्योगसमूहाची सुत्रे हाती घ्यावी लागली. त्यानंतर १९७९ साली त्यांनी विप्रो कंपनीची स्थापना केली. वेर्स्टन इंडिया प्रोडक्ट लिमिटेड असं विप्रोचं पूर्ण नाव आहे. 


हेही वाचा -

फुड पॅकेटवर असणारा बारकोड 'असा' काम करतो

ऑनलाईन शॉपिंग करताय? मग असा मिळवा डिस्काऊंट


पुढील बातमी
इतर बातम्या