Advertisement

फुड पॅकेटवर असणारा बारकोड 'असा' काम करतो


फुड पॅकेटवर असणारा बारकोड 'असा' काम करतो
SHARES

पॅकिंग केलेल्या वस्तूंवर आपण अनेकदा वेगवेगळ्या जाडीच्या उभ्या रेषांचा संच पाहिला असेल. पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाच्या या रेषा असतात. त्या रेषांना बारकोड असे म्हणतात. दहावी आणि बारावीच्या परिक्षेला देखील उत्तरपत्रिकेवर बारकोडचा वापर करण्यात येतो हे आपण पाहिलंच असेल. पण हा बारकोड नेमका कसा तयार होतो? हे तुम्हाला माहिती नसेल. आज याचीच माहिती अाम्ही तुम्हाला देणार आहोत.


बारकोड म्हणजे काय?

पॅकिंग केलेल्या पॅकेटवर असणारं बारकोड हे मशीनद्वारे वाचता येतं. मशीनद्वारे वाचता येईल अशा आकड्यांचा हा संच असतो जो कमी जास्त जाडीच्या समांतर रेषांच्या स्वरूपात लिहिलेला असतो. इनकोडिंग केल्यानंतर मशीनद्वारे बारकोड वाचता येतो. या कोडमध्ये वस्तूची संबंधीत माहिती असते. जसं की वस्तूचे वजन, किंमत, उत्पादनाची तारीख, शेवटच्या वापराची तारीख ही सर्व माहिती कोडिंगच्या माध्यमातून मिळते.



एकमितीय आणि द्विमितीय असे बारकोडचे दोन प्रकार आहेत. एकमितीय बारकोडचा उपयोग किराणा माल, कमी किमतीच्या वस्तू जसं की पेन, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांवर केला जातो.


'असा' काम करतो बारकोड

एका बारकोडला 95 ब्लॉक असतात. त्या 95 पैकी 12 ब्लॉकमध्ये बारकोड लिहिला जातो. 12 पैकी तीन ब्लॉक हे लेफ्ट गार्ड, सेंटर गार्ड आणि राईट गार्ड या नावानं ओळखले जातात.


बारकोड वाचण्यासाठी असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये लेझर लाईटचा वापर केलेला असतो. हे मशीन डावीकडून उजवीकडे अशा क्रमानं बारकोड वरच्या रेषा वाचत जातो. हे मशीन वाचलेली रेषांच्या रुपातील माहिती बायनरी कोडमध्ये (0 किंवा 1) रुपांतरीत करते. संगणक फक्त बायनेरी रूपात असलेली माहिती वाचू शकतो आणि तीच माहिती तो स्क्रिनवर दाखवतो. सेंटर गार्डच्या डाव्या बाजूला असलेल्या आकड्यावरून ती वस्तू प्लास्टिक किंवा मानवनिर्मित पदार्थावरून बनलेली आहे, मांसाहारी किंवा शाकाहारी आहे हे संगणकाला कळते. खाली दिलेल्या फोटोत शून्याच्या जागी दोन आकडा लिहिलेला असेल तर ते खाद्यपदार्थ आहे. जर शून्याच्या जागी 3 असेल तर औषध आहे असं कळतं. अशा प्रकारे माहितीचं संकलन होतं.



हेही वाचा

EXCLUSIVE : १२०० फोन्सचा मालक, 'नोकिया मॅन' आहे याची ओळख!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा