ऑनलाईन शॉपिंग करायला कुणाला नाही आवडत. महिलांप्रमाणे पुरुषदेखील ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देतात. ऑनलाईन शॉपिंगमुळे वेळही वाचतो आणि चांगले पर्यायही मिळतात. पण पैशांची बचत करत ऑनलाईन शॉपिंग कशी करायची? याच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ट्रिक्स फॉलो करा आणि ऑनलाईन खरेदीत चांगला डिस्काऊंट मिळवा.
1) ऑनलाईन शॉपिंगसाठी तुमचं फक्त एक नाही तर खूप सारे अकाऊंट्स तयार करा. दुसऱ्याला रेफर करून सवलत मिळवण्यापेक्षा आपल्याच वेगवेगळ्या अकाऊंटवरून स्वत:ला रेफर करा. याचा अजून एक फायदा म्हणजे नवीन खात्यावरून केलेल्या पहिल्या खरेदीवर तुम्हाला डिस्काऊंट मिळू शकेल.
2) अनेकदा ठराविक किंमतीच्यावर खरेदी केल्यासच फ्री होम डिलीव्हरी मिळते. त्यामुळे ठरावीक किमतीहून अधिक खरेदी करावी लागते किंवा होम डिलीव्हरी किंमत मोजावी लागते. त्यामुळे वेबसाईटद्वारे फुलफिल्ड केलेले प्रोडक्ट्स पहायला हवेत. कारण या वस्तू कितीही किमतीच्या असोत पण त्यावर फ्री होम डिलीव्हरी द्यावीच लागते.
3) ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती कंपनी कोणत्या वस्तूंवर कॅशबॅक देते यावर लक्ष ठेवा. कारण हे तुमच्या फायद्याचं असू शकतं. अनेकदा ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांना 40 ते 50 टक्के कॅशबॅक मिळतो.
4) ऑनलाईन शॉपिंगसाठी फिल्टरचा वापर करणं फायदेशीर आहे. यामुळे अनेकदा खरेदीवर सवलत मिळते.
5) प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी इतर वेबसाईट देखील पाहा. तुम्ही ऑनलाईन घेणाऱ्या वस्तूची किंमत प्रत्येक वेबसाईटला वेगळी असू शकते. त्यामुळे कमीत कमी किंमत कुठल्या साईटवर आहे याचा अंदाज येईल आणि कमीत कमी किंमतीत वस्तू खरेदी करता येईल.
6) ऑनलाईन खरेदीसाठी कार्टचा वापर करा. त्यामुळे तुमची आवडती वस्तू कार्टमध्ये ठेवून त्याची किंमत कमी होण्याची वाट पाहू शकता. त्यानंतर ती खरेदी केल्यास तुम्हाला योग्य सवलत मिळू शकते.
7) वेबसाईट अनेकदा प्रेमोशनसाठी डिस्काऊंट देत असतात. त्यामुळे वेबसाईटच्या सेल पेजवर लक्ष ठेवलंत तर मोठी बचत होईल.
8) कंपनी तुम्हाला अनेकदा खरेदीवर कुपन्स देते. तुमच्या मेल आयडीवर आलेले कुपन्सचे मेल नीट वाचा.
9) ऑनलाईन खरेदीसाठी आता प्रत्येक कंपनीचं अॅप असतं. या अॅपनं खरेदी केल्यास किंवा अॅपच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना जोडल्यानंही डिस्काऊंट मिळू शकेल.
हेही वाचा