Advertisement

५० लाख जिंकायचेत? मग 'या' गेमिंग स्पर्धेत सहभागी व्हाच!

सोशल मीडियावर पबजी (PUBG - PlayerUnkown’s Battlegrounds) हा गेम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यात या गेमचे अनेक फोलोअर्स तयार झालेत. या गेमची वाढती क्रेझ पाहता 'पबजी' एक गेमिंग स्पर्धा घेऊन आले आहेत. ज्यात तुम्हाला थोडेथोडके नव्हे, तर ५० लाख रुपये जिंकता येतील.

५० लाख जिंकायचेत? मग 'या' गेमिंग स्पर्धेत सहभागी व्हाच!
SHARES

'पबजी' या गेमनं तुम्हालाही भुरळ घातलीय का? नसेल तर याबाबत नक्की वाचा. कारण या मारधाडवाल्या गेमनं सध्या तरूणांमध्ये धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर पबजी (PUBG - PlayerUnkown’s Battlegrounds) हा गेम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यात या गेमचे अनेक फोलोअर्स तयार झालेत. या गेमची वाढती क्रेझ पाहता 'पबजी' एक गेमिंग स्पर्धा घेऊन आले आहेत.


कसा खेळतात गेम?

पोकेमॉन गो, ब्ल्यू व्हेल या गेम्सनंतर आता पबजीची क्रेझ आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम सध्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. गेम खेळण्याबरोबरच त्यामध्ये चॅटिंगही करता येतं. हा खेळ एकट्याने, दोन जणांमध्ये किंवा ग्रुप करून खेळता येतो.गेममध्ये एका रँडम जागेवर तुम्हाला सोडलं जातं. तिथं तुम्हाला 'सर्व्हायव्हल'साठी खेळणं भाग असतं. यामध्ये तुम्हाला स्वत: च गन्स शोधाव्या लागतात. गन्स शोधून तुमच्या प्रतिस्पर्धींंना मारणं आवश्यक असतं. गेममध्ये दिलेल्या एका जागेवर म्हणजेच एका बोर्डवर १०० खेळाडू असतात. त्यामुळे त्या जागेवरील ९९ जणांना मारून तुम्हाला 'सर्व्हाइव्ह' होणं भाग असतं. तेव्हाच तुम्ही हा गेम जिंकू शकता.PUBG मोबाईल चॅम्पियनशीप

कॉलेजच्या तरूणांना ध्यानात ठेऊन PUBG मोबाईल चॅम्पियनशीप या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. PUBG ही मोबाईल चॅम्पियन स्पर्धा आहे. भारतातल्या ३० शहरातील तब्बल १ हजार कॉलेजांतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या सुरुवातीला २० टीम्स तयार करण्यात येतील. प्रत्येक टीममध्ये एकाच कॉलेजच्या ४ जणांचा समावेश असेल. या चॅम्पियनशीपमध्ये नॉकआऊट फेरीसुद्धा असणार आहे. सर्वात महत्त्वाचं हा गेम जिंकलात तर ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.कुठे कराल अर्ज?

इतरांना हा खेळ पाहता यावा म्हणून खेळाचं सोशल मीडियावर लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल. चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी ७ ते २३ सप्टेंबर दरम्यान अर्ज करता येईल. त्यांच्या वेबसाईटवर http://pubgmobile.in/2018/ तुम्ही अर्ज करू शकता.हेही वाचा-

'इथं' भरणार पहिलावहिला 'घुबड महोत्सव'संबंधित विषय
Advertisement