Advertisement

'इथं' भरणार पहिलावहिला 'घुबड महोत्सव'

घुबडा हा पक्षी दिसायला भले रागीट वाटत असेल. पण तसं नाही. या पक्षाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहेत. याच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मुंबईपासून काही अंतरावर 'घुबड महोत्सव' आयोजित करण्यात आलाय.

'इथं' भरणार पहिलावहिला 'घुबड महोत्सव'
SHARES

आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो किंवा जास्तीत जास्त पोपट, कबुतर पाळतो. पण तुम्ही कधी घुबड पाळला आहे का? पाळणं तर सोडाच पण घरी कळलं की तुम्ही घुबड पाहिला आहे मग काही खरं नाही. घुबड पाहणं चांगलं नाही. त्यामुळे काही तरी वाईट घडतं, असं आजी किंवा आई सांगते. लहानपणी तर आजी सांगायची, घुबडाला दगड मारला तर दगड पकडतो, घुबड पाहिलं की बुटके होतो, असं सांगून घाबरवलंदेखील जायचं


आई आणि आजीच कशाला हॉरर चित्रपटांमध्ये अधिक भिती वाटावी म्हणून घुबडाला दाखवलं जातं. मला तर फक्त एका चित्रपटात घुबड बिचारा दाखवलेला आठवतो तो म्हणजे हॅरी पॉटर. या चित्रपटात काय तो मेसेज पाठवण्यासाठी घुबडाचा वापर केला जायचा. भारतात मात्र आजही घुबडासंदर्भात अनेक अंधश्रद्धा आहेत. याच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पहिल्यांदाच 'घुबड महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे.

 


पहिलावहिला घुबड महोत्सव

मुंबईपासून २१६.५ किलोमीटर अंतरावर घुबड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्याच्या जेजुरीजवळील पिंगोरी इथं २९ आणि ३० नोव्हेंबर या दोन दिवशी महोत्सव भरणार आहे. पक्षी संशोधक संस्था 'इला फाऊंडेशन'नं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. हा भारतातील पहिलावहिला महोत्सव ठरणार आहे. 


महोत्सवाची वैशिष्टे

या महोत्सवाला लहान मुलांनी हजर रहावं म्हणून जंगी तयारी केली जाते. गाणी, पोस्टर्स, चित्र, कविता, नाटुकली सादर करण्याचं आवाहन शाळांना करण्यात आलं आहे. इला फाऊंडेशननुसार या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या महोत्सवात चर्चासत्रांचं आयोजनदेखील केलं आहे. पक्षी शास्त्रज्ञ, तज्ञ व्यक्ती, फोटोग्राफर्स, सिने क्षेत्रातील मंडळींकडून तुम्हाला घुबडाबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.इला हॅबिटेटची जनजागृती मोहीम

'इला फाऊंडेशन'नं घुबड पक्षासंदर्भात लोकांमध्ये असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. इला फाऊंडेशननुसार एका वर्षात जवळपास ७० ते ८० हजार घुबड मारले जातात. पिसांसाठी किंवा त्यांच्यापासून औषध बनवण्यासाठी त्यांची तस्करी केली जाते. अनेकदा अंधश्रद्धेपोटी त्यांचा बळी दिला जातो. अशा अनेक कारणांमुळे या पक्षांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.तुमच्या मनात देखील घुबडासंदर्भात अंधश्रद्धा किंवा भिती असेल तर या महोत्सवाला भेट द्या. कदाचीत प्रत्यक्षात घुबडाला पाहून किंवा त्याच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुमच्या मनातील शंका दूर होईल. त्यामुळे आम्ही तर हाच सल्ला देऊ की तुम्ही तर जाताल पण तुमच्या घरातील लहानग्यांनादेखील या महोत्सवाला घेऊन जा.हेही वाचा

'इथं' भरते फुलपाखरांची शाळा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा