Advertisement

'इथं' भरते फुलपाखरांची शाळा

संदीपचे वडील विनय आठल्ये हे पर्यावरणप्रेमी होते. आरे कॉलनीतल्या २००० चौ. फूट जंगलात त्यांनी अनेक झाडं लावली आहेत. तिथंच एक फुलपाखरू उद्यान तयार करावं असं विनय आठल्ये यांचं स्वप्न होतं. विनय आठल्ये यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा संदीप आठल्ये यांनी त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला.

'इथं' भरते फुलपाखरांची शाळा
SHARES

छान किती दिसते फुलपाखरू... ही कविता लहानपणी आपण पुस्तकात वाचली असेलच. त्यानंतर कधीतरी गावाकडच्या जंगलात फेरफटका मारताना तर कधी ट्रेकिंगला गेलेले असताना तुम्ही फुलपाखरू पाहिले असतील. पण आता मुंबईसारख्या शहरातदेखील रंगीबीरंगी फुलपाखरांच्या सान्निध्यात आपल्याला वेळ घालवण्याची संधी उपलब्ध झाला आहे. ही संधी उपलब्ध करून दिली आहे संदीप आठल्ये या तरूणानं.


वडिलांना अशीही श्रद्धांजली

हल्ली घरांमध्ये मुलं आपल्या आई-वडिलांना विचारतदेखील नाहीत. काही घरात तर आश्रमात टाकलं जातं. पण संदीपनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. संदीपचे वडील विनय आठल्ये हे पर्यावरणप्रेमी होते. आरे कॉलनीतल्या २००० चौ. फूट जंगलात त्यांनी अनेक झाडं लावली आहेत. तिथंच एक फुलपाखरू उद्यान तयार करावं असं विनय आठल्ये यांचं स्वप्न होतं. विनय आठल्ये यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा संदीप आठल्ये यांनी त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला.


'असं' बहरलं उद्यान

गोरेगावमधल्या आरेत पंचवटी उद्यानात तुम्हाला १०० ते १५० प्रकारची फुलपाखरं आढळतील. ब्ल्यू टायगर, स्ट्राइफ टायगर, ऑरेंज टेप्स, कॉमन क्रो, चॉकलेट पॅन्सी, पिकॉक पॅन्सी अशा वेगवेगळ्या फुलपाखरांनी हे उद्यान बहरलं आहे. २००० एकरात हे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आलं आहे. २०१५ साली हा भूखंड ओसाड होता. पण या जागी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि या जागेचं रुपडं पालटून टाकलं. यासाठी संदीपनं एक वर्ष संशोधन केलं. फुलपाखरू अभ्यासक रेखा शहाणे यांचीदेखील संदीपनं मदत घेतली. फुलपाखरांचं अस्तित्व कायम रहावं यासाठी इथं अशोक, बाभूळ, कढीपत्ता, जमकत अशी विविध प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत. जेणेकरून फुलपाखरं या वृक्षांकडं आकर्षित होतील.


पडीक जागेवर बाग

गोरेगावचे रहिवासी असलेले विनय आठल्ये म्हणजेच संदीपचे बाबा यांनी २००१ साली निस्वार्थपणे आरे वसाहतीतील पडीक जमिनीवर आपल्या मित्रांच्या मदतीनं पंचवटी उद्यान साकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला एक किलोमीटरचा रस्ता निवडून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा १०० झाडे लावली. केवळ झाडं लावून सोडलं नाही तर रोज मोटारसायकलवरून पाणी नेऊन त्या झाडांची निगा राखण्याचं काम त्यांनी केलं. २००१ पासून ते आजतागायत ५० प्रकारची झाडं आरे परिसरात लावण्यात आली आहेत. विनय आठल्ये यांच्यानंतर आता ही जबाबदारी संदीपनं उचलली आहे.



उद्यानाचं नाव पंचवटी का?

इथल्या जागेवर पूर्वेला पिंपळ, पश्चिमेला वड, दक्षिणेला आवळा, उत्तरेला बेल, आग्नेयला अशोक वृक्ष असल्याने अशा स्थानाला पंचवटी म्हटलं जात. म्हणून या उद्यानाला पंचवटी हे नाव देण्यात आलं आहे. या पंचवटी उद्यानात फोटो वॉक, फुलपाखरू वॉकचंदेखील आयोजन केलं जातं. स्मारक कसं असावं त्याचं हे योग्य उदाहरण आहे. ज्यातून इतरांना आनंद मिळेल. यासोबतच काही तरी नवीन शिकता येईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षणही होईल. संदीपचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा. जेणेकरून मुंबईत चोहीकडे हिरवळ नांदेल.



हेही वाचा

'इथं' आहे फुलपाखरांचं रंगीबेरंगी विश्व!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा