दिवाळीचा (diwali) सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी (mumbai) रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.
दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दादरसह (dadar) दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये (markets) झालेल्य गर्दीमुळे मुंगीलाही पाय ठेवायला जागा उरली नव्हती.
दीपावलीसाठी (diwali) ग्राहकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या होत्या. जीएसटीतील कपातीमुळे दिवाळीत मोठमोठ्या, महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी (shopping) यंदा झुंबड उडाली आहे.
काही वस्तूंच्या किमती यंदा काही प्रमाणात वाढल्या असल्या तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
कपडे, भांडी, कंदील, पणत्या, शोभेचे साहित्य, फटाके, विद्युत रोषणाईसाठी तोरणे, रांगोळ्यांसाठी लागणारे साहित्य, फराळ, भेटवस्तू यांची जोरदार खरेदी रविवारी झाली.
दिवाळीच्या खरेदीसाठी अवघे काही दिवस राहिल्याने व रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये लोकांना चालायलाही जागा नव्हती. ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून व्यापारीवर्गात यंदा आनंदाचे वातावरण पसरले होते.
आतापर्यंत मातीच्या पणत्यांना दिवाळीत महत्त्वाचे स्थान होते. आता या तेलमातीच्या पणत्यांची जागा लाइटिंगच्या चिनीमातीच्या पणत्यांनी घेतलेली दिसत होती. चिनी बनावटीच्या विविध स्वस्त वस्तूंची बाजारपेठेत मोठी रेलचेल होती.
हेही वाचा