सेनापती बापट मार्गावरील दादर (dadar) मासळी बाजारातील विक्रेत्यांनी वडाळा येथे स्थलांतर करण्यास नकार दिला आहे. हा भूखंड मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवडला आहे.
"आमचे कायमचे स्थलांतर इथेच झाले आहे त्यामुळे तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्नच उद्भवत नाही," असे दादर मासळी बाजार (dadar fish market) संघटनेच्या एका सदस्याने सांगितले.
दादरच्या स्वराज्य सीएचएसमधील रहिवासी गेल्या महिन्यात मासळी बाजाराविरुद्ध रस्त्यावर उतरले होते. त्यांनी म्हटले होते की, एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यापासून परिसरातील वाहतूक वाढली आहे.
तसेच मासळी बाजारामुळे वाहतुकीचा गोंधळ वाढला आहे. रहिवाशांच्या या निषेधाला स्थानिक आमदार महेश सावंत (mahesh sawant) यांनी पाठिंबा दिला आहे.
आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल सावंत यांच्यासह रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आणि दादर मासळी बाजार तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी केली. तथापि, मासे विक्रेत्यांनी त्यांची जागा सोडण्यास नकार दिला आहे.
"आम्हाला आयुक्तांसोबत कोणत्याही संयुक्त बैठकीसाठी बोलावण्यात आले नव्हते. आमचा खटला उच्च न्यायालयात (bombay high court) सुरू आहे. न्यायालयाने आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे." असे दादर मासळी बाजार संघटनेच्या सदस्याने सांगितले.
हेही वाचा