पाहा, ‘लकी’च्या प्रीमियरला कोण कोण आलंय?

सिनेमॅटोग्राफर, निर्माता, दिग्दर्शक संजय जाधवचा ‘लकी’ हा मराठी सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा प्रीमियर शो हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला. जुहू येथील पीव्हीआर सिनेमागृहात दाखवण्यात आलेल्या ‘लकी’च्या प्रीमियर शोला कोण कोण आलंय ते पाहा.

‘लकी’ सिनेमासाठी गायन करणारे गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांच्यासोबत दिग्दर्शक संजय जाधव व मुख्य भूमिकेतील अभय महाजन.

संजय जाधवसोबत गप्पा मारताना अभिनेता सुमित राघवन आणि पत्नी चिन्मयी सुमीत.

सुमीत राघवन, मिलिंद पाठक, तुषार दळवी आणि प्रसाद ओक यांची धमाल

सोनाली खरे, तेजस्विनी पंडीत, हर्षदा खानविलकर यांची जमली गट्टी.

अंकुश चौधरीने सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडीतसोबत दिली अशी पोझ.

अमेय वाघला झाला अभयसोबत सेल्फी काढण्याचा मोह.

संगीतकार पंकज पडघन, अभय महाजन, संजय जाधव, दिप्ती सती आणि संगीतकार अमितराजनेही पाहिला ‘लकी’


हेही वाचा -

‘ठाकरे २’चा दिग्दर्शक अभिजीत (पा) नसे?

मायकेल जॅक्सनने लावला रितेशच्या 'डोक्याला शॉट' !


पुढील बातमी
इतर बातम्या