Advertisement

‘ठाकरे २’चा दिग्दर्शक अभिजीत (पा) नसे?

'ठाकरे' सिनेमाच्या पुढील भागाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे करणार नाही. ऐकून धक्का बसला ना, हो पण हे खर आहे.

‘ठाकरे २’चा दिग्दर्शक अभिजीत (पा) नसे?
SHARES

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून कायम चर्चेचा विषय ठरलेला ‘ठाकरे’ सिनेमाचा पहिला भाग निर्विघ्नपणे रिलीज झाला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. सिनेमाच्या शेवटी ‘ठाकरे २’चे संकेत देण्यात आले आहेत, पण 'ठाकरे' सिनेमाच्या पुढील भागाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे करणार नाहीत. ऐकून धक्का बसला ना, हो पण हे खरं आहे. ‘मुंबई लाइव्ह’शी अनौपचारिक बातचित करताना दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी ‘ठाकरे’च्या पुढील भागाचं दिग्दर्शन करणार नसल्याचं सांगितलं.


स्पेशल शो मिळालेली वागणूक

'ठाकरे' सिनेमाचा पुढील भाग न करण्यामागचं कारण मात्र पानसे यांनी स्पष्ट केलं नसलं तरी ‘ठाकरे’च्या स्पेशल शोला मिळालेली वागणूक असल्याचं म्हटलं जात आहे. स्पेशल शो पाहण्यासाठी आलेल्या पानसे आणि त्यांच्या कुटुंबियांना बसायला जागाच मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होऊन सिनेमागृहाबाहेर पडले होते. त्यानंतर सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी त्यांची मनधरणी केली होती.


नवा दिग्दर्शक कोण?

या सर्वांचा परिणाम म्हणून ‘ठाकरे’च्या पुढील भागाचं दिग्दर्शन पानसे करणार नाहीत की, आणखी काही कारण आहे ते अद्याप समजलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पानसेंना मिळालेल्या वागणूकीला सोशल मीडियावर विरोध दर्शवल्यानेही निर्माते नाराज झाले होते. नेमकं काय घडलं ते लवकरच समजेल. दरम्यान ‘ठाकरे’ रिलीज झाल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून राऊत, तर मनसेच्या झेंड्याखाली पानसे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत.


निवडणूकीनंतर शोधकार्य

‘ठाकरे’च्या पुढील भागाच्या तयारीलाही अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. येत्या लोकसभा निवडणूकीनंतर ‘ठाकरे २’च्या कामाला थोडी गती मिळेल, असा चित्रपटतज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या पानसेंकडे इतर दोन मराठी सिनेमांच्या दिग्दर्शनाच्या आॅफर्स असून, त्यावर ते काम करत आहेत. परंतु पानसेंनी नकार दिल्यानंतर आता संजय राऊत ‘ठाकरे’च्या पुढील भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कोणाकडे सोपवणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.



हेही वाचा -

मायकेल जॅक्सनने लावला रितेशच्या 'डोक्याला शॉट' !



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा