'गुलाबजाम'चा चविष्ट ट्रेलर आणि पंगतीचं आमंत्रणही!

गुलाबजाम...नावानेच तोंडाला पाणी सुटतं. पण हा गुलाबजाम चाखण्याआधी त्याचा ट्रेलर तुम्हाला पहावा लागणार आहे! होय. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला गुलाबजाम हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. मात्र त्याआधी त्याचा ट्रेलर सिनेमाच्या टीमने लाँच केला आहे. हा ट्रेलर पाहून गुलाबजामबद्दल सगळयांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.

गोडाशिवाय जेवण नाही!

'गोड पदार्थाशिवाय आपलं जेवणं पूर्ण होत नाही, असं म्हणत' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात होते. राधा आणि आदित्यची ही आगळीवेगळी कथा आहे. लंडनहून भारतीय खासकरून महाराष्ट्रीय पदार्थ शिकण्यासाठी भारतात आलेल्या आदित्य आणि त्याची गुरू राधा. आदित्यला लंडनमध्ये स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करायचं असतं. मात्र, त्याला गरज असते एका गुरूची. आदित्य पुण्यात आल्यावर राधाच्या हातचे गुलाबजाम खातो आणि राधालाच आपली गुरू करण्याचे निश्चित करतो. पण राधा आदित्यला पदार्थ शिकवणार का? हे प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावरच कळणार आहे.

पंगतीला नक्की या!

'१६ फेब्रुवारीला पंगतीला नक्की या, वाट बघतोय!' असं म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गुलाबजामचा ट्रेलर तिच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे.


हेही वाचा

सोनालीच्या 'गुलाबजाम'चा गोड टीझर

पुढील बातमी
इतर बातम्या