Advertisement

सोनालीच्या 'गुलाबजाम'चा गोड टीझर


सोनालीच्या 'गुलाबजाम'चा गोड टीझर
SHARES

सोनाली कुलकर्णीचा 'गुलाबजाम' हा सिनेमा गुलाबजाम इतकाच गोड असेल हे नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझर बघितल्यावर कळतं. सोनाली कुलकर्णीने तिचा आगामी सिनेमा गुलाबजामचा टीझर तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या टीझरला तिने 'माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..आमच्या स्वयंपाकाची' असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.



या टीझरमध्ये काय?

'चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते त्याचा वास'..या ओळीने टीझरची सुरुवात होते. स्वयंपाक करताना मनातील गोष्ट पदार्थाला कशी सांगायची असते, आणि त्याचा पदार्थावर कसा परिणाम होतो हे या टीझरमधून दाखवण्यात आलं आहे. टीझरमध्येच दिग्दर्शकाचं कौशल्य दिसत असलं तरी संपूर्ण टीझरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा समोर आलेला नाही. मात्र टीझरमधून सोनाली कुलकर्णीचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहचतो.


अशी आहे सिनेमाची कथा

लंडनमधील एका मराठी माणसाची ही कथा आहे. जो खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो.  पुण्यात राहणाऱ्या राधा म्हणजेच सोनाली कुलकर्णीकडून तो मराठी माणूस म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर खाद्य पदार्थ बनवण्यास शिकतो. पुढे त्यांच्यात मैत्री होते आणि त्या मैत्रीला काय वळण लागतं हे गुलाबजाम बघितल्यावरच तुम्हाला कळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा